16 May 2024 2:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Federal Bank Share Price | 149 रुपयाचा शेअर अल्पावधीत 26 टक्के परतावा देईल, झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील खास शेअर

Federal Bank Share Price

Federal Bank Share Price | ब्रोकरेज हाऊस नोमुराने शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना फेडरल बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. फेडरल बँकेत सध्या नवीन सीईओ निवडीची प्रक्रिया सुरू आहे. मार्च 2024 च्या अखेरीस फेडरल बँड नवीन सीईओच्या नियुक्तीची घोषणा करू शकते. फेडरल बँक स्टॉक राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील फेवरेट स्टॉक आहे. आज गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी फेडरल बँकेचे शेअर्स 0.37 टक्के घसरणीसह 149.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नोमुरा फर्मने फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला असून 190 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 26 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 151 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज या बँकेचे शेअर्स किंचित घसरणीसह ट्रेड करत आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर फेडरल बँकेचे शेअर्स खरेदी केले तर अल्पावधीत तुम्हाला 26 टक्के नफा मिळू शकतो.

मागील एका वर्षात फेडरल बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या बँकेच्या शेअर्सची किंमत 6 टक्के वाढली आहे. डिसेंबर 2023 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये फेडरल बँकेचे 2 टक्के म्हणजेच 48,213,440 इक्विटी शेअर्स आहेत. त्यांचे एकूण मुल्य 730.4 कोटी रुपये आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार फेडरल बँकेच्या नवीन सीईओ पदासाठी योग्य उमेदवारांचा शोध सुरू आहे. यासाठी केव्हीएस मनियान यांचे नाव अंतिम यादीत असल्याची माहिती मिळत आहे. बँकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे. फेडरल बँकेवर सध्या असुरक्षित किरकोळ कर्जाचा कोणताही दबाव नाही. फेडरल बँकेला बिझनेस बँकिंग आणि मायक्रो फायनान्स, कृषी, ग्रामीण आणि सुवर्ण कर्जातून चांगला फायदा झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Federal Bank Share Price NSE Live 29 February 2024.

हॅशटॅग्स

#Federal Bank Share Price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x