10 May 2024 12:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

IRFC Vs RVNL Share Price | रेल्वे सेवा संबंधित शेअर्स खरेदी करावे? 1 वर्षात मल्टिबॅगर परतावा दिला, पण पुढे काय होणार?

IRFC Vs RVNL Share Price

IRFC Vs RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील काही वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मात्र आज हा स्टॉक किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स आणखी वाढू शकतात, असे संकेत मिळत आहेत. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

नुकताच महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने आरव्हीएनएल कंपनीला 339.2 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. आज मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.65 टक्के घसरणीसह 242.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 282 टक्के परतावा कमावून दिला होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 249.55 रुपये किमतीवर ओपन झाले होते. काही तासात शेअर्सची किंमत 253 रुपये किमतीवर पोहचली होती. मागील एका महिन्यात आरव्हीएनएल स्टॉक 7 टक्क्यांनी कमजोर झाला आहे.

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 345.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 60.30 रुपये होती. आरव्हीएनएल कंपनीला पुणे मेट्रो रेल्वे नेटवर्कचे 4.519 किमी लांबीचे एलिव्हेटेड व्हायाडक्टचे डिझाइन आणि बांधकाम करण्याचे कंत्राट मिळाले आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंपनीला 130 आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

एका वर्षापूर्वी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 60.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 250 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 51,249 कोटी रुपये आहे. आरव्हीएनएल स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 1.5 आहे. जो उच्च अस्थिरता दर्शवत आहे. 23 जानेवारी 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉकने 345.60 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर 16 मार्च 2023 रोजी या कंपनीच्या शेअर्सने 60.30 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती.

आरव्हीएनएल स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 48.5 अंकावर आहे. यावरून सूचित होते की, हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. आरव्हीएनएल स्टॉक आपल्या 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवसांच्या सरासरी किंमत पातळीच्या खाली ट्रेड करत आहे. तर 5 दिवस, 10 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसाच्या सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs RVNL Share Price NSE Live 19 March 2024.

हॅशटॅग्स

IRFC Vs RVNL Share price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x