18 May 2024 7:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

SJVN Share Price | एसजेव्हीएन शेअर्स अल्पावधीत मोठी कमाई करून देणार, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 121.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. शेअर बाजारात देखील उत्साह पाहायला मिळत आहे. परिणामस्वरूप एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 2.31 टक्के वाढीसह 124.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )

ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजच्या तज्ञांच्या मते, एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 150 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढू शकतो. शेअर बाजारातील तज्ञांनी एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना 117 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

एसजेव्हीएन कंपनीने पुढील दोन आर्थिक वर्षांमध्ये 4000 कोटी रुपये महसूल संकलन करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कंपनीच्या एमडी आणि चेअरमन गीता कपूर यांनी एका निवेदनात म्हंटले की, एसजेव्हीएन कंपनीने आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये 2700 कोटी रुपये महसूल संकलित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. तर आर्थिक वर्ष 2025-2026 मध्ये महसूल संकलन आणखी 1000 कोटी ते 1500 कोटी रुपयेने वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये एसजेव्हीएन कंपनीने 2938 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

एसजेव्हीएन कंपनीने आपला व्यवसाय विस्तार करण्यासाठी पुढील दोन वर्षात 1176 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता जोडण्याची योजना जाहीर केली आहे. सध्या SJVN कंपनीकडे 1972 मेगावॅट जलविद्युत क्षमता आणि 404 मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता आहे. कंपनीने पुढील काळात 2000 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प सप्टेंबर 2024 पर्यंत कार्यान्वित करण्याची योजना आखली आहे. पुढील आर्थिक वर्षात कंपनी आपल्या वीज निर्मिती क्षमतेत 2,900 मेगावॅटची वाढ करणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price NSE Live 01 April 2024.

हॅशटॅग्स

SJVN Share price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x