19 March 2024 3:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
DroneAcharya Share Price | अल्पावधीत मजबूत परतावा देतोय हा शेअर, वेळीच खरेदी करा, ऑर्डरबुक मजबूत झाली Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Reliance Infra Share Price | मार्ग श्रीमंतीचा! रिलायन्स इन्फ्रा शेअरने 2 दिवसात 20 टक्के परतावा दिला, खरेदी करावा IFCI Share Price | 4 रुपयाच्या शेअरने मालामाल केलं, अल्पावधीत दिला 875 टक्के परतावा, खरेदी करणार? TCS Share Price | टीसीएस शेअर्समध्ये मोठी घसरण सुरु, कंपनीच्या मोठ्या निर्णयाने शेअर पुढे किती घसरणार? Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेटने शेअरवर परिणाम, शेअरची प्राईस खूप घसरणार? IPO GMP | स्वस्त IPO शेअरने लॉटरी लागली! एकदिवसात 101 टक्के परतावा मिळाला, गुंतवणूकदार मालामाल
x

अण्वस्त्रं प्रथम वापरणार नाही हे आत्तापर्यंतचं धोरण: राजनाथ सिंह

Rajanath Singh, Nuclear weapon, Defense Minister of India

नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पोखरणमध्ये मोठं विधान केलेले आहे. आजपर्यंत भारताने कधीही अण्वस्त्राचा वापर पहिल्यांदा केला नाही पण भविष्यात काय घडेल ते तेव्हाच्या परिस्थितीवर निर्भर आहे असं विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात त्यांनी विधान केले आहे.

राजनाथ सिंह म्हणाले, “आजपर्यंत आपले अण्वस्त्र धोरण हे ‘नो फर्स्ट युज’ असे राहिले आहे. मात्र, भविष्यात काय घडेल हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल” दरम्यान, राजनाथ यांनी याबाबत एक ट्विटही केले आहे. त्या ते म्हणातात, “पोखरण ही अशी जागा आहे ज्यामुळे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला आण्विक शक्ती म्हणून ओळख मिळवून दिली. तसेच यावेळी त्यांनी ‘नो फर्स्ट युज’ हे तत्वही निश्चित केले. भारत या तत्वाचे कसोशीने पालन करीत आहे मात्र, भविष्यात काय घडेल हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.”

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x