29 April 2024 4:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

शेअर बाजार कोसळला; गुंतवणूकदारांचं २.७९ लाख कोटींचं नुकसान

Stock Market, Nifty, Sensex, MCX, Share Market

मुंबई: जीडीपी दर अपेक्षेपेक्षा कमी; तसंच इतर महत्वाच्या क्षेत्रांत कासवगतीनं सुरू असलेल्या विकासाचा परिणाम शेअर बाजारावर झाला. दुपारी सव्वातीनच्या सुमारास सेन्सेक्समध्ये तब्बल ८०० अंकांची घसरण नोंदवली आणि तो ३६,५००वर पोहोचला. निफ्टीतही २४.४० अंकांची घसरण नोंदवून तो १०७८२.८५ वर पोहोचला.

जगभरातील आर्थिक क्षेत्रावर सध्या मंदीची टांगती तलवार आहे. लोकांचा गुंतवणुकीकडे ओढा कमी होत आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. आज दिवसअखेर शेअर बाजारातील निर्देशांकात तब्बल ८०० अंकांची घसरण पाहायला मिळाली. तसेच रुपयाही ६४ पैशांनी घसरला. याचा फटका हिंदुस्थानच्या आर्थिक विकासाला बसणार आहे.

शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसअखेर ३६,५६३ पोहोचला. तर निफ्टीही २२५ अंकांनी घसरून १०,७९८ अंकांवर पोहोचला. जून त्रैमासिकात जीडीपीमध्ये घसरण झाल्याने शेअर बाजारावर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. अर्थतज्ज्ञांच्या अंदाजानुसार अपेक्षेपेक्षा कमी जीडीपी राहिल्याने गुंतवणुकदारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचाच हा परिणाम आहे.

अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेलं ट्रेड वाॅर जोरदार आहे. दोघांनीही एकमेकांच्या उत्पादनांवरचा टॅरिफ वाढवलाय. याचा परिणाम आशियाई बाजारांच्या घरगुती बाजारांवर पाहायला मिळतो. मॅनिफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी ऑगस्टमध्ये विक्री कमी झाल्यानं १५ महिन्यात अगदी खालच्या स्तरावर पोचल्यानं शेअर बाजारात निराशा आहे. याआधी जून तिमाही GDP ग्रोथ ६ वर्षांत खालच्या स्तरावर पोचली होती. IHS मार्किट इंडिया मॅनिफॅक्चरिंग PMI ऑगस्टमध्ये घसरण होऊन ५१.४ वर आलेला. तो जुलैमध्ये ५२.५ वर होता. मे २०१८ नंतर तो सर्वात खालचा स्तर होता.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x