27 April 2024 4:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवणं पाकिस्तानच्या हिताचं : रामदास आठवले

PoK, Pak Occupied Kashmir, Jammu Kashmir, Pakistan, Article 370, Pakistan PM Imran Khan, Union minister Ramdas Athavale

चंदीगड: पाकव्याप्त काश्मीर पाकिस्ताननं भारताला सोपवणं हे पाकिस्तानच्या हिताचं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेला पाकिस्तानसोबत रहायचे नाही, हे अनेक वृत्तांमधून समोर आले आहे. जर पाकिस्तानला युद्ध नको असेल आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या हिताचा विचार असेल तर त्यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवावा,” असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. ते चंदीगडमध्ये बोलत होते.

पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना पाकिस्तानसोबत राहायचं नाही. मागील ७० वर्षांपासून पाकिस्तानने काश्मीरचा एक तृतीयांश भाग गिळंकृत केला आहे. हे प्रकरण गंभीर आहे’ असं आठवले यांनी म्हटलं आहे. चंदीगड येथे खात्याच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रामदास आठवले यांनी असं म्हटलं आहे. ‘नरेंद्र मोदी हे धाडसी पंतप्रधान आहेत. कलम ३७० रद्द करण्याचा त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला. पाकिस्तानने अनेकदा काश्मीरचा मुद्दा उचलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. पाकिस्तानने आता भारताला पाकव्याप्त काश्मीर सोपवला पाहिजे आणि ते पाकिस्तानच्या हिताचं असेल’ असं देखील रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x