26 April 2024 2:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला
x

पंतप्रधान मोदींचा ग्लोबल गोलकीपर पुरस्कारानं सन्मान

Melinda gets Foundation, PM Narendra Modi, Gets Foundation

न्यूयॉर्क: भारतात यशस्वीरित्या स्वच्छता अभियान राबवण्यात येत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन’च्या प्रतिष्ठित अशा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. फाऊंडेशनचे अध्यक्ष बिल गेट्स यांनी मोदींना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. दरम्यान, ज्या लोकांना हे अभियान जनआंदोलनात बदलले त्यांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

“या अभियानाचा सर्वाधिक फायदा देशातील गरीब आणि महिला वर्गाला मिळाला आहे. भारत या विश्वाला आपलं कुटुंब मानतो. त्यामुळे या अभियानात भारताने दिलेल्या योगदानामुळे मला आनंद होत आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले. “वसुधैव कुटुंबकम् अशी शिकवण आम्हाला हजारो वर्षांपासून देण्यात आली आहे. आम्ही स्वच्छतेच्या दृष्टीने जे लक्ष्य ठेवले आहे त्याच्या आम्ही जवळ पोहोचत आहोत.याव्यतिरिक्तही भारत अन्य अभियान राबवत आहे. फिट इंडिया मुव्हमेंटद्वारे फिटनेस आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअरला आम्ही प्रोत्साहन देण्याचं काम करत आहोत. जल जीवन अभियानाअंतर्गत पाणी वाचवण्यावर आणि त्याच्या पुनर्वापरावरही आम्ही काम करत आहोत,” असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

ग्लोबल गोलकीपर पुरस्कारानं गौरवण्यात आल्यानंतर मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं. हा माझा एकट्याचा सन्मान नसून कोट्यवधी भारतीयांचा सन्मान असल्याचं मोदी म्हणाले. कोट्यवधी भारतीयांनी स्वच्छ भारताचं स्वप्न पूर्ण केलं. त्यासाठी स्वच्छतेला आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाचं स्थान दिलं, अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या. महात्मा गांधींनी स्वच्छतेचं स्वप्न पाहिलं होतं. ते आता पूर्ण होत आहे. एखादं गाव स्वच्छ होईल, तेव्हाच त्या गावाला आदर्श म्हणता येईल, असं महात्मा गांधी म्हणाले होते. मात्र आता आम्ही एक गाव नव्हे, तर संपूर्ण देशच स्वच्छ करण्याकडे वाटचाल करत आहोत, असं मोदींनी म्हटलं.

गेल्या पाच वर्षात स्वच्छतेसाठी अनेक पावलं उचलण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं. पाच वर्षांमध्ये ११ कोटी शौचालयं बांधण्यात आली. त्यामुळे अनेकांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. अनेकांच्या प्रतिष्ठेचं त्यामुळे रक्षण झालं, असं मोदींनी म्हटलं. भूगर्भातील पाण्याच्या गुणवत्तेतही पाच वर्षात सुधारणा झाली. यामध्येही स्वच्छ भारत योजनेची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं मोदी म्हणाले. स्वच्छतेमुळे लहान मुलांमधील हृदयाशी संबंधित समस्यांचं प्रमाण कमी झाल्याचंदेखील पंतप्रधानांनी म्हटलं. यावेळी त्यांनी बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या अहवालाचा संदर्भ दिला.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x