27 April 2024 11:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

केंद्राने जनतेच्या जीवनावश्यक मुद्यांवर लक्ष द्यावे, नको त्या प्रश्नांत लोकांना भरकटवू नका: मुख्यमंत्री

Citizen Amendment Bill, Loksabha, Amit Shah

नवी दिल्ली: लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं राज्यसभेत वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. ‘लोकसभेत जे झालं, ते विसरून जा. राज्यसभेत जेव्हा विधेयक मांडले जाईल तेव्हा शिवसेनेची भूमिका सर्वांपुढं येईलच,’ असं शिवसेना संसदीय पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

लोकसभेत मांडलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकामध्ये स्पष्टता दिसत नाही. आम्ही बाजूने मतदान केलं. ते का केलं? सरकारच्या बाजूने केलं म्हणजे देशभक्ती नाही. घुसखोरांना बाहेर काढावे ही आमची भूमिका. जोपर्यंत त्यामध्ये स्पष्टता येत नाही, तोपर्यंत आम्ही पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.शिवसेनेने काय करावे हे कुणी सांगू नये. ३७० कलम काढले त्याचे सर्वप्रथम अभिनंदन आम्ही केले, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

देशातील जनतेच्या दैनंदिन जीवनावश्यक मुद्यांवर सरकारने अधिक लक्ष द्यावे, नकोत्या प्रश्नांत गुंतवून मुद्दे भरकटवू नयेत , असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. ”नागरिकत्व सुधारणा विधेयकाला जर देशातील नागरिक घाबरत असतील, तर त्यांच्या शंकांचे निरसन झाले पाहिजे. ते आपल्या देशाचे नागरिक आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे,”असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

 

Citizen Amendment Bill Chief Minister Uddhav Thackeray response support given on Citizen Amendment Bill in Loksabha

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x