'सारथी'च्या बचावासाठी खासदार छत्रपती संभाजीराजेंचं पुण्यात उपोषण
पुणेः छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्वायत्तता अबाधित ठेवावी, यांसह विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांनी आगरकर रस्त्यावरच ठिय्या देत लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या वेळी सारथीला मोठ्या प्रमाणात निधी द्या, प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांच्यावर कारवाई करा, असे फलकही आंदोलकांनी झळकविले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत सारथी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेही उपोषणाला बसलेत.
या संदर्भात काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तात्काळ मार्ग काढण्याचा शब्दही दिला होता.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 9, 2020
मराठा, कुणबी समाजाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्थेबाबत (सारथी) विविध आदेश काढून, संस्थेला बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप छत्रपती संभीजी राजे यांनी केला आहे. यासाठी त्यांनी आज पुण्यात लाक्षणिक उपोषणास सुरूवात केली आहे.
आज मला जाणीव झाली आहे की, लोकशाही मार्गाने या मनमानी विरोधात लाक्षणिक उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही. दिनांक- 11-01-2020 रोजी सारथी कार्यालयाजवळ शेकडो कार्यकर्ते आणि सारथी च्या लाभार्थ्यांसोबत बसणार आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 9, 2020
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सारथी संस्थेतील अनेक वादविवाद समोर येत आहेत. त्यासंदर्भात छत्रपती संभाजी राजे यांनी दोन दिवसांपूर्वी सारथी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी छत्रपती संभाजी राजे म्हणाले, सारथी संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्याची चौकशी व्हावी पण ती प्रामाणिकपणे व योग्य अधिकाऱ्यांमार्फत होणे गरजेचे आहे. सारथी संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यांना संपूर्ण माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर त्वरीत बैठक घेवून यातून मार्ग काढणार असल्याचे सांगितले आहे.
माझी भूमिका ही सुरुवातीपासून स्पष्ट आहे. मला राजकारणापेक्षा समाज महत्वाचा वाटतो. मी शिवशाहूं चा वारसदार आहे. सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन त्या सर्वांचा उत्कर्ष करण्याची शिकवण माझ्या घराण्यातील पूर्वजांनी दिली आहे. आम्हाला सर्व जाती, सर्व समाज समान आहेत.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 10, 2020
Web Title: MP Chhatrapati Sambhaji Raje Protest for Sarthi in Pune.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?