29 April 2024 7:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

मेगाभरती अंगलट! आमदार फुटण्याची भाजपाला भीती? निष्ठावंतांना जपण्याचा संदेश: सविस्तर वृत्त

MLA Chandrakant Patil, Mega Bharti

मुंबई: विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकल्यानंतरही भारतीय जनता पक्षाला विरोधात बसावं लागल्याचं मोठं दुःख आहे. त्यात भारतीय जनता पक्षातील जुन्या जाणत्या अनेक निष्ठावंतांना पक्षात तिकीटं मिळाली नाही याचा देखील प्रचंड राग आहे. त्यामुळे खुद्द महाराष्ट्र पक्षाध्यक्षांनीच निवडणूकपूर्व मेगाभरतीला वाचा फोडल्याने भारतीय जनता पक्षातील हा सुप्त असंतोष कदाचित मोठ्या प्रमाणावर वाढीस लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान मेगाभरतीसंदर्भात चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खोचक टीका केली आहे. या राजकीय धक्क्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वर भारतीय जनता पक्षाला देवो अशा शब्दात त्यांनी सणसणीत टोला हाणला आहे.

फडणवीसांचे संकटमोचक गिरीश महाजन या सगळ्या मेगाभरतीचे सूत्रधार होते. पण निकालानंतर जे चित्र पुढे आलं त्यामुळे ही मेगाभरती भाजपला फायद्याची ठरली नाही हे सिद्ध झालंय. याची कबुली प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. त्यांच्या या विधानामुळे भाजपमध्येही त्याबाबतीत असंतोष आहे हे स्पष्ट झालंय. पिंपरी-चिंचवड इथं झालेल्या भाजपच्या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती थोडी बिघडली. भाजपची संस्कृती अशी नव्हती. हा पक्ष प्रेमावर चालतो. पण थोडा बदल झाला. जो काम करतो त्याला नाही तर तो आपल्या जवळ आहे त्याला पदं दिली गेलीत. हे कल्चर आता उद्धवस्त करावं लागणार आहे.

सरकार स्थापनेच्या सुरुवातीलाच बहुमताचा आकडा गाठणं अशक्य असल्याचं लक्षात येताच भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत असं जाहीर केलं. मात्र, मागील काही दिवसांपासून असमर्थ ठरणारे भाजपचे नेते अचानक पुन्हा आमचंच सरकार येणार असं वारंवार बोलू लागले आहेत. परंतु, त्यामागील मुख्य कारण दुसरंच असल्याचं वृत्त आहे. कारण महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होताच भारतीय जनता पक्षातील विद्यमान नेते मंडळी भाजपाला सोडचिट्ठी देण्याचा मार्गावर असल्याची चुणचुण भाजपाला लागली आहे.

अगदी सोप्या भाषेत बोलायचे झाल्यास भाजपाला रामराम ठोकून काँग्रेस-राष्ट्र्वादीत फेर-मेगाभरती होणार असल्याचं वृत्त आहे. त्यात भाजपमध्ये गेलेले काँग्रेस-राष्ट्र्वादीतील मोठे नेते सामील असून, त्यात सर्वाधिक नेते विधानसभेत आमदार होऊन निवडून आले आहेत. अगदीच उदाहरण द्यायचे झाल्यास, काँग्रेसचे नगरमधील माजी नेते तसेच माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा देखील समावेश असल्याचं वृत्त आहे. भाजपमध्ये देखील त्यांनी विशेष कामगिरी न केल्याने त्यांचं भाजपातील वजन घटलं असून, भाजपाची सत्ता गेल्याने विरोधी पक्ष नेते पद देखील फडणवीसांना गेलं आणि विखे पाटील ५ वर्ष विधानसभेत केवळ आमदार म्हणून राहतील जे त्यांना राजकीय दृष्ट्या धोक्याचं आहे.

भाजपमध्ये आयत्यावेळी प्रवेश केलेल्या नेत्यांची निकालानंतरच्या घडामोडींमुळे मोठी राजकीय कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांना २०२४च्या अनुषंगाने मतदारसंघात स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवायचे असल्यास राज्यात सत्तेत येणाऱ्या राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा शिवसेनेच्या आश्रयाला जावे लागेल अशी राजकीय अडचण निर्माण झाली आहे.

पंचायत समितीत देखील महाविकास आघाडीने भाजपाला धक्के दिल्याने स्थानिक पातळीवर स्वतःच राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी सत्ताधारी पक्षांमध्ये जाणं सोयीचं समजत आहेत. भाजपातील किमान १७ विद्यमान आमदार राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे कमित कमी पक्षातील निष्ठावंत तरी कसे जपता येतील यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे वक्तव्य केल्याचं म्हटलं जातं आहे. तसेच आयतांना पक्षात प्राधान्य देऊन मेगा भरती करणाऱ्या फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या विरुद्ध भाजपातील निष्ठावंतांचा रोष वाढू नये याची काळजी घेण्यास राज्य भाजप सरसावल्याचं म्हटलं जातं आहे आणि त्यामुळे भाजपात लवकरच नेत्यांचे महविकास आघाडीत प्रवेश करणं सुरु होणार असल्याचं वृत्त आहे.

 

Web Title:  BJP State President Chandrakant Patil talked on Mega Bharti in BJP before Maharashtra Assembly Election 2019.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x