6 May 2024 11:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या
x

इंदिरा गांधींबद्दलच्या वक्तव्यावरून अशोक चव्हाण यांच आव्हाडांना जोरदार प्रत्युत्तर

Ashok Chavan, Indira Gandhi, Jitendra Awhad

मुंबई : जितेंद्र आव्हाड यांनी देशातील सद्य:स्थितीला ‘हिटलरशाही’ संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. हा संदर्भ देताना आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. आव्हाड म्हणाले की, “इंदिरा गांधींनीदेखील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा अहमदाबादेतून पहिला उठाव झाला आणि विद्यार्थ्यांच्या चळवळीतूनच जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व उदयाला आले. अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांचे आंदोलन देशाला दुसरे स्वातंत्र्य मिळवून देईल” असं आव्हाड म्हणाले होते.

दरम्यान, आव्हाड यांच्या या वक्तव्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अशोक चव्हाण यांनी एक ट्विट केले असून त्यात म्हटले की, देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्‍या इंदिराजी गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी यांनी वेळीच खुलासा केला ते बरे झाले. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे अशोक चव्हाण म्हणाले.

त्यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. बीडमध्ये बुधवारी संविधान बचाव महासभा झाली. यावेळी बोलताना आव्हाड यांनी देशाची सध्याची स्थिती ही हुकूमशाहीसदृश असल्याची टीका करताना इंदिरा गांधी यांना लक्ष्य केलं. इंदिरा गांधी यांनीही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, अशा शब्दांत आव्हाड यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून घटकपक्षांकडून एकमेकांच्या प्रिय नेत्यांबाबत वादग्रस्त विधानं सुरूच आहेत. राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली. मग त्यानंतर करीम लाला इंदिरा गांधींना भेटायचा असं संजय राऊत म्हणाले. आणि आता आव्हाडांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं.

 

Web Title:  Minister Ashok Chavan reply to Jitendra Awhad over statement made against former PM Indira Gandhi.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Jitendra Awhad(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x