28 April 2024 1:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल
x

हे ऑटो रिक्षा सरकार; फार काळ टीकणार नाही: देवेंद्र फडणवीस

Opposition Leader Devendra Fadnavis, Delhi Politics

मुंबई : मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी नाही. मी महाराष्ट्र सोडणार नाही, असे सांगत दिल्लीत जाणार नाही हे स्पष्ट केले. आमचे सरकार पुन्हा आणारच, असा निर्धार करत माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी केला. जोपर्यंत महाराष्ट्रात सरकार येत नाही तोपर्यंत जाणार नाही. सध्याचे सरकार हे राजकीय हाराकिरी करून आलेले सरकार आहे. आपले सरकार बहुमताने आलेले होते. उद्या भविष्यात मोठे यश मिळल्याशिवाय राहणार नाही, असा दावा फडवणीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला भाषणाआधी काही जणांनी विचारलं, तुम्ही दिल्लीला चालला आहात का? मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो. मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी नाही. या महाराष्ट्रात जोपर्यंत पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार येत नाही तोपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सोडणार नाही. या महाराष्ट्रातच संघर्ष करुन पुन्हा भारतीय जनता पक्षाचं, शिवसंग्राम आणि आपल्या युतीचं सरकार आणल्याशिवाय मी राहणार नाही.

अरबी समुद्राचा मुद्दा उपस्थित करत, जाणीवपूर्वक शिवस्मारकाचं काम थांबविण्याचं काम हे सरकार करत आहे. ऑटो रिक्षा सरकार असून या सरकारची तिन्ही चाके वेगवेगळ्या दिशेने जात आहेत. त्यामुळे, हे सरकार फार काळ टीकणार नाही, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. भविष्यकाळात संधी मिळाल्यास राहिलेली काम पूर्ण करूयात. मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी मी नाही. या महाराष्ट्रात जोपर्यंत पुन्हा सरकार येत नाही, तोपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सोडणार नाही. महाराष्ट्रात संघर्ष करुन भारतीय जनता पक्ष आणि शिवसंग्राम युतीचं सरकार आणल्याशिवाय मी गप्प राहणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

आम्ही बदल्याच्या भावनेने कधीही वागलो नाही. मात्र हे सरकार प्रगती नाही तर स्थगिती सरकार आहे अशीही टीका फडणवीस यांनी केली. एवढंच नाही तर शिवस्मारकाचं काम या सरकारने जाणीवपूर्वक थांबवलं असाही आरोप फडणवीस यांनी केला. लोकशाहीची मूल्य या सरकारला मान्य नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला तर आम्हीही रस्त्यावर उतरवू आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ असा इशाराही विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी दिला.

 

Web Title:  I am not going to Delhi Politics says Former CM Devendra Fadnavis.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x