2 May 2024 4:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा ठरले भाजपसाठी शनीचा अवतार

Prashant Kishore, I-Pac Company, Delhi Assembly Election 2020

नवी दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होत आहे. दिल्लीत कोणाचे सरकार स्थापन होणार,… पुन्हा केजरीवाल सरकार कमबॅक करणार का?… भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसची कामगिरी कशी असेल?…. आपची हॅटट्रिक भाजप रोखणार का?… मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज खरे ठरणार का?…. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळत आहेत.

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुका जाहीर होताच मोठी घोषणा केली होती. त्यांनी त्यासंदर्भात ट्विट करून सांगितले होतं की, प्रशांत किशोर यांची कंपनी आयपॅक दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षासोबत काम करणार आहे.

इंडियन पॉलिटीकल एक्शन कमिटी औपचारीकरित्या राजकीय पक्षांचा प्रचार करते. त्यामुळे अर्थात दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर आम आदमी पक्षाचा प्रचार करणार हे निश्चित झालं होतं. नुकतीच प्रशांत किशोर यांची जनता दल युनाईटेडमधून हकालपट्टी झाली होती, मात्र, अजून त्यांनी त्याबाबत पुढचे राजकीय पट्टे उघड केलेले नाहीत. तत्पूर्वी त्यांनी २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यानंतर त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार यांचा प्रचार केला होता. ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. तर २०१७ मध्ये त्यांनी अमरिंदर सिंग यांचाही प्रचार केला. ते देखील सत्तेत आले.

तत्पूर्वी, प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्रात शिवसेनेसाठी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काम केल्याचं सर्वश्रुत आहे. त्यावेळी आदित्य संवाद आणि शिवआशीर्वाद संकल्पना देखील प्रशांत किशोर यांच्या टीमने सुचवलं होतं आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांना राज्याच्या ग्रामीण भागात पोहोचविण्यात आलं. तसेच आंध्र प्रदेशमध्ये वायएस जगमोहन रेड्डी यांच्यासाठी देखील त्यांनी लोकसभा-विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली होती आणि आज त्यांची देखील आंध्रप्रदेशात एकहाती सत्ता आहे.

२०१२ मध्ये पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष आणि ममतादीदी गेले काही वर्षे देशातील राजकारणात मागे पडल्याचे चित्र आहे. तृणमूलमधील अनेक खासदार आणि आमदारांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर तृणमूल पक्षाचा ‘मेकओव्हर’ करण्यासाठी आणि ब्रँड ममता तयार करण्यासाठी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर याची मदत घेतली जाणार आहे.

 

Web Title:  Prashant Kishore I Pack made it possible for AAP and Bad luck for BJP.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x