27 April 2024 8:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

तृप्ती देसाईंची थेट मुख्यमंत्र्यांना त्यांच्या दालनात कोंडून ठेवण्याची धमकी...नेमक्या काय म्हणाल्या?

CM Uddhav Thackeray, Trupti Desai, Indurikar Maharaj

मुंबई: प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीसंदर्भात गर्भलिंग चाचणीसंदर्भात वक्तव्याबाबात एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यासंदर्भात सोशल मीडियावर टीकेची झोड उडाली होती.

मात्र सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य करुन वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. “समाज माध्यमात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. २६ वर्षाच्या किर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन , समाजसंग्रह , अंधश्रद्धा निर्मूलन विवीध जाचक रुढी परंपरा यावर मी भर दिला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. तमाम महिलावर्गाची दिलगिरी”, असं इंदोरीकर महाराजांनी म्हटलं आहे. इंदोरीकर महाराजांनी पत्रक प्रसिद्ध करुन दिलगिरी व्यक्त केली आहे.

इंदुरीकर महाराज यांनी माफीनामा जारी करत ही माफी मागितली आहे. माझ्या अभ्यासानुसार मी काही वक्तव्य केलं होतं. त्याचा गेल्या आठ दिवसांपासून सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातून विपर्यास केला जात आहे. मी वारकरी संप्रदायाचा पाईक असून गेल्या २६ वर्षांपासून समाजप्रबोधनाचं आणि अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम करत आहे. गेल्या २६ वर्षांत मी जाचक रुढी-परंपरा दूर होण्यासाठीही अथक प्रयत्न केले होते. मात्र माझ्या कीर्तनरुपी सेवेतील एका वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हटलं आहे.

मात्र त्यानंतर देखील तृप्ती देसाई यांचं समाधान झालं नसल्याचं दिसतं आहे. यावरून तृप्ती देसाई म्हणाल्यात की, इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली असून, त्यांच्याकडे लेखी तक्रारसुद्धा करण्यात आली आहे. इंदोरीकर हे आपल्या अनेक कीर्तनांमधून महिलांचा अपमान करतात. त्यामुळे असा अपमान सहन केला जाणार नसल्याचं त्या म्हणाल्या.

इंदोरीकर यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. तशी मागणी पोलिसांकडे केली असून, त्यांनी सकारात्मक आश्वासन आम्हाला दिले आहे. मात्र तरीही गुन्हा दाखल झाला नाही तर, उद्धव ठाकरे यांना त्यांच्या दालनात कोंडून अधिवेशनात गोंधळ घालू, असा इशाराही तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

 

Web Title: Story Trupti Desai warned Chief Minister Uddhav Thackeray over demanding Indorikar Maharaj file crime.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x