27 April 2024 2:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे: उद्धव ठाकरे

Hindutva, CM Uddhav Thackeray, Ayodhya

अयोध्या : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला.

मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. उद्धव ठाकरे संध्याकाळी ४ वाजता रामल्लाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होतील. रामलल्लाचे दर्शन घेण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले, मी तिसऱ्यांदा अयोध्येत आलो होते. अयोध्येते येणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी वारंवार अयोध्येत येईन. नोव्हेंबरमध्ये अयोध्येला आलो आणि नोव्हेंबरमध्येच मी मुख्यमंत्री झालो. मी स्वप्नातही याचा विचार केला नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या आधी आलो होतो. त्यावेळी चांगले यश मिळाले होते. मी अयोध्येला नियमित येत राहणार आहे. मी प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद घेणार आहे.

 

News English Summery: Maharashtra Chief Minister and Shiv Sena party chief Uddhav Thackeray is on a visit to Ayodhya today. At this time, Uddhav Thackeray announced a grant of Rs 1 crore for the construction of Ram temple. At this time, Uddhav Thackeray also answered reporters’ questions. He opposed the criticism that Shiv Sena withdrew from Hindutva in coalition with the Congress. I am separated from BJP, not Hindutva. Uddhav Thackeray said that BJP is not Hindutva. Uddhav Thackeray will visit Ramla at 4 pm. After this they will depart again towards Mumbai. Before the visit of Ramlalla, Chief Minister Thackeray was speaking at a press conference. He added, I came to Ayodhya for the third time. To come to Ayodhya is a fortune for me. I will come to Ayodhya frequently. I came to Ayodhya in November and in November I became Chief Minister. I hadn’t even thought about it in a dream. The Lok Sabha had come before the elections. There were good successes at that time. I will be coming regularly to Ayodhya. I will take the blessings of Lord Sriram.

 

Web English Title: Story BJP Party means not Hindutva said CM Uddhav Thackeray during Ayodhya Tour.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x