27 April 2024 7:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

१४ वर्ष कधीही 'प्रकाशात' न आलेल्यांनी शॅडो कॅबिनेटचा निर्णय घेतला: काँग्रेस

Congress spokesperson Sachin Sawant, MNS Shadow cabinet

मुंबई: राज्य सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेने महाअधिवेशनात शॅडो कॅबिनेट स्थापणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार मनसेने शॅडो कॅबिनेटची स्थापना केली असून त्यात राज ठाकरेंनी विशिष्ट स्थरातील पदाधिकाऱ्यांना स्थान दिलं आहे. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान शॅडो कॅबिनेटमधील प्रत्येक नेत्यावर संबंधित खात्याच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच शॅडो कॅबिनेटमधील हे नेते एखाद्या मंत्र्याने गैरव्यवहार केला, तर त्याचा पाठपुरावा करणार आहेत.

महाराष्ट्रातील विविध समाजगटासाठीसाठी एक वेगळा प्रयोग म्हणून मनसेने प्रतिरुप मंत्रिमंडळाची (शॅडो कॅबिनेट) स्थापना करण्यात आली आहे. सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी हे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे. सरकारचे वाभाडे काढण्यासाठी हे शॅडो कॅबिनेट आहे. पण प्रत्येकवेळी वाभाडेच काढले पाहिजेत असे नाही. तर त्यांनी चांगले काम केले तर त्यांचे कौतुकही करायचे, असे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले.

मनसेच्या या निर्णयावर काँग्रेसने खोचक प्रतिक्रिया व्यक्त दिली आहे. यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत मनसेला वर्धापनदिनीच खोचक टोला लगावला आहे. यावर त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे, “शॅडो कॅबिनेटचा निर्णय अशा शॅडो पक्षाने घेतला आहे जो १४ वर्ष कधीही प्रकाशात आला नाही, कुठलाही प्रकाश पाडू शकला नाही. आंदोलने करायची आणि अंधारात सेटलमेंट करायची हे रात्रउद्योग जनतेने गेली अनेक वर्ष पाहिलेले आहेत. त्यामुळे याचा काडीमात्र प्रभाव जनतेवर पडणार नाही, हे मात्र निश्चित!

तत्पूर्वी शिवसेनेनं प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, मनसेनं विधायक सूचना करण्यासाठी जर हे केलं असेल तर त्यांच्या सूचनांचा आम्ही विचार करू. मात्र राजकारणासाठी हे काम असेल तर मात्र आम्ही त्याला महत्त्व देणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री आणि नेत अनिल परब यांनी व्यक्त केली.राज्याच्या विकासासाठी जे कुणी विधायक सूचना करतील त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही त्याचा विचार करू आणि त्या घेता येतील का ते पाहू मात्र विरोधासाठी विरोधाला किंमत देत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

News English Summery: Congress has reacted to this decision by MNS. Congress spokesperson Sachin Sawant tweeted that the MNS has taken a dig at the anniversary. He tweeted, “The Shadow Cabinet has decided that the Shadow Party, which has never come to light for 14 years, has never been able to shed any light. The public has seen many years of agitation and settlement in the dark. It does not matter, however!

 

Web News Title: Story Congress spokesperson Sachin Sawant criticized MNS Shadow cabinet decision.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x