29 April 2024 1:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

औरंगाबाद: रॅलीला परवानगी नाकारली; पण उद्या शिवजयंती साजरी होणारच: राज ठाकरे

Aurangabad, Shiv Jayanti, MNS Chief Raj Thackeray

औरंगाबाद, ११ मार्च : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने आता महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणच्या यात्रा आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यातच आता औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक पुढे ढकण्याची मागणी करण्यात आली आहे. खुद्द महापौरांनीच ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. येत्या एप्रिल महिन्यात औरंगाबाद महापालिकेची मुदत संपणार आहे.

कोरोना व्हायरसची भीती पाहता महापालिका निवडणूक सहा महिने पुढे ढकला अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच निवडणूक पुढे ढकलताना पालिकेवर प्रशासक नेमू नये. विद्यमान नगरसेवकांनाच सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महापौर नंदकुमार घोडले यांनी केली आहे.

दुसरीकडे शिवजयंतीसाठी औरंगाबाद येथे दाखल झालेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कार्यक्रम आयोजित करण्यास नकार देण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कार्यक्रमांना नकार दिला आहे. परंतु, यावर राज ठाकरे यांनी नाराजी दर्शवली आहे. कोरोना विषाणूमुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आपल्याकडे अद्याप त्याची तीव्रता नाही. ‘पॅनिक’ करण्यासारखं राज्यात घडलेले नाही. लोकांना का घाबरवत आहात, असा सवाल राज ठाकरे यांनी प्रशासनाला केला आहे. ते औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

परंतु, आज राज ठाकरे यांनी उद्या शिवजयंती साजरी होणारच असं स्पष्ट केलं आहे. सकाळी शिवरायांची पुजा करून पुढील कार्यक्रम केला जाणार आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं. तसंच, राज्य प्रशासन कोरोना व्हायरसमुळे उगाच लोकांना पॅनिक करत आहे. एकही रुग्ण दगावला नाही. मग उगाच कशाला बाऊ केला जातोय, असा सवालच राज ठाकरेंनी उपस्थितीत केला.

उद्या शिवजयंतीच्या निमित्ताने राज ठाकरे आपल्या मुलासह औरंगाबादमध्ये दाखल झाले आहे. अमित यांच्या नेतृत्त्वाखाली औरंगाबादमध्ये मिरवणूक काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचं एकाप्रकारे हे जोरदार शक्तिप्रदर्शन होणार होतं. परंतु, पोलिसांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी नाकारली आहे.

 

News English Summery: Worldwide, a great terror of the Corona virus has spread. Positive patient has been found in Pune, Maharashtra. But, on the other hand, MNS president Raj Thackeray said, ‘Nobody has cheated yet. The state government has been panicking people, ‘it said. In the new year, MNS has taken up the issue of Hindutva with a fresh start. MNS president Raj Thackeray is on a visit to Aurangabad. It was announced that MNS would celebrate the birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj in Aurangabad. However, the MORN program was denied permission due to the Corona virus. But today, Raj Thackeray has made it clear that Shiv Jayanti will be celebrated tomorrow. Raj Thackeray said that the next program will be performed by worshiping Shivarai in the morning. Also, the state administration is panicking people because of the corona virus. No patient was knocked out. Then Raj Thackeray raised the question as to why he was being bullied.

 

Web News Title: Story MNS Chief Raj Thackeray on Corona Virus at Aurangabad Shiv Jayanti Issue.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x