29 April 2024 8:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

महानगरातील सर्व खासगी ऑफिसेस बंद राहणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Corona Virus, News Latest Updates

मुंबई, २० मार्च : अर्धी मुंबई बंद असली तर बस आणि रेल्वे सेवा बंद होणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई, पुणे आणि महानगरातील सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. राज्यात सर्व दुकानं आणि व्यापार बंद राहतील पण जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

करोनाचा मुकाबला करण्यासाठी १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जीवनावश्यक सेवा सोडून मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद करण्यात येत आहेत. येत्या ३१ मार्चपर्यत ही बंदी राहणार, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

‘रेल्वे आणि बस या आपल्या शहराच्या वाहिन्या आहेत. त्या बंद करणे सोपं आहे, पण त्या बंद केल्यानंतर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांवर परिणाम होईल. महापालिका कर्मचारी, डॉक्टर यांची ने-आण कशी होईल. तुर्त या दोन सेवा बंद न करता राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थितील 25 टक्क्यावर आणली आहे. यापूर्वी ती ५० टक्क्यांवर आणली होती. मुंबई महानगर परिसर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर जिथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. जीवनाश्यक वस्तू व्यक्तिरिक्त सर्व गोष्टी बंद. ही बंदी ३१ मार्चपर्यंत असेल’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

 

News English Summery:  Chief Minister Uddhav Thackeray has announced that bus and train services will not be closed if half Mumbai is closed. Uddhav Thackeray has announced that all private offices in Mumbai, Pune and metropolis will be closed. All shops and trade in the state will remain closed but no shortage of essential commodities, the Chief Minister said. 15 days is crucial for combating coronas. Due to this, all shops and offices in Mumbai, Nagpur, Pune, Pimpri Chinchwad are being closed except for essential services. Chief Minister Uddhav Thackeray announced that the ban would remain in place until March 31. ‘Trains and buses are the vessels of our city. It is easy to close it, but closing it will affect the essential service providers. How will the staff of the municipal staff, the doctors? Without immediately discontinuing these two services, the attendance of all employees in the state has been reduced to 25%. It had previously brought it down to 50 percent. There are international airports in Mumbai Metropolitan area, Pune, Pimpri-Chinchwad, Nagpur. Essential things close to everything except the person. The ban will be till March 31, “the chief minister said.

 

News English Title:  Story CM Uddhav Thackeray press conference on corona virus awareness Mumbai corona News Latest updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x