5 May 2024 2:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

महाराष्ट्रात १२ तासांत ८२ नवे बाधित; रुग्णसंख्या दोन हजारांवर

Covid19, Corona Crisis

मुंबई, १३ एप्रिल : महाराष्ट्रात आत्तापर्यंत आणखी ८२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या ही २ हजार ६४ इतकी झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. ८२ पैकी ५९ रुग्ण मुंबईतले आहेत. महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत तर देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउनही ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. खबरदारीचे सगळे उपाय योजण्यात आले आहेत. महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनही आखण्यात आले आले आहेत.

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४१ हजार १०९ नमुन्यांपैकी ३७ हजार ९६४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर १९८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ६१ हजार २४७ व्यक्ती होम क्वारंटाइन असून ५०६४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेली धारावी आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहे. धारावीमध्ये गेल्या १२ तासात ४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे धारावीतील रुग्ण संख्या आता ४७ वर पोहोचली आहे. त्यातील एका ६० वर्षीय रुग्णाचा सायन रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर धारावीमध्ये मृतकांची संख्या १० वर पोहोचली आहे. रुग्णांच्या या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

 

News English Summary: So far 82 more patients have been found to be Corona positive in Maharashtra. Therefore, the number of coronary victims in Maharashtra has increased to 2 thousand 64. This information is provided by the Health Department of the Government of Maharashtra. Of the 82 patients, 59 are from Mumbai. Mumbai has the highest number of coronary patients in Maharashtra and Maharashtra is the highest in the country. Lockdown in Maharashtra has also been extended till April 30. All precautionary measures have been taken. Red, Orange and Green zones have also been set up in Maharashtra.

News English Title: Story corona with 82 new cases Maharashtra tally reached up to 2064 Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x