29 April 2024 5:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका
x

केरळमध्ये पुन्हा कोरोना रुग्ण वाढले, मान्सूनसोबत कोरोनाची दुसरी लाट?

Kerala, Faster Than National Average, covid 19 patients

थिरूअनंतपूरम , २८ मे : केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मागच्या एका आठवडयात केरळमध्ये ३०० पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. केरळमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले होते. या महिन्याच्या मध्यापर्यंत केरळमध्ये परिस्थिती नियंत्रणात होती. पण आता केरळमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. देशातंर्गत प्रवास आणि परदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे.

मागच्या एका आठवडयात केरळमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६६६ वरुन १००३ पर्यंत पोहोचली आहे. म्हणजे रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा वेग १२ दिवसांपेक्षा कमी आहे. राष्ट्रीय स्तरावर कोरोना रुग्णांची संख्या दुप्प्ट होण्याचे प्रमाण १४ दिवस आहे.

दरम्यान, देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण मुंबईत आहेत. बुधवारी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ३३ हजार ८३५ वर पोहोचली. मुंबईतील वॉर्डचा विचार करता सर्वाधिक कोरोना रुग्ण जी-उत्तर वॉर्डमध्ये आहेत. हा वॉर्ड म्हणजे धारावीचा परिसर.

मुंबईत गेल्या सात दिवसांत कोरोनाव्हारसची नवीन प्रकरणं दररोज सरासरी ५.१७ टक्क्यांनी वाढत आहेत. माहीम, धारावी आणि दादर परिसरात तब्बल २,७२८ कोरोना रुग्ण आहेत. धारावी परिसरातील वाढत्या प्रकरणांमुळे मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडाही झपाट्याने वाढतो आहे. तर आर उत्तर म्हणजे दहिसर क्षेत्रात सर्वात कमी ३०९ कोरोना रुग्णांची नोंद आहे.

 

News English Summary: The number of corona virus patients is on the rise in Kerala once again. In the last one week, more than 300 people have been infected with corona in Kerala. The number of corona patients in Kerala is growing faster than the national average. This was reported by Indian Express.

News English Title: Kerala Now Growing Faster Than National Average covid 19 patients News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x