2 May 2024 4:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

मिशन गगनयान मोहिमेला होऊ शकतो विलंब – इस्त्रो

First Trial flight, Gaganyaan, lockdown ISRO

नवी दिल्ली, ११ जून: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्यामुळे मिशन गगनयान मोहिम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता इस्त्रोने वर्तवली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था सध्या मिशन गगनयान मोहिमेवर काम करत आहे. या मोहिमेची तयारी सध्या सुरू असून, या मोहिमेला लॉकडाउनमुळे उशिर होण्याची शक्यता इस्रोच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली.

चांद्रयान मोहीम शेवटच्या टप्प्यात अयशस्वी झाल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने मिशन गगनयान मोहिमेवर काम सुरू केले. ही भारताची पहिली मानवरहित अवकाश मोहीम असणार आहे. या मोहिमेवर काम सुरू असतानाच कोरोनाच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन घोषित झाला. त्याचा परिणाम मिशन गगनयानवर होण्याचे संकेत इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

“करोनामुळे काही प्रमाणात व्यत्यय आला आहे. पण अजून निश्चितपणे तसं सांगता येणार नाही. आमच्याकडे अजून सहा महिन्यांचा कालावधी आहे, त्यामुळे अंदाज घेण्याची गरज आहे. आम्ही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मिशन गगनयान मोहिमेच्या वेळापत्रकात थोडा बदल होऊ शकतो. पण, संपूर्ण मूल्यमापन केल्यानंतरच हे लक्षात येऊ शकेल. सध्या याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही. कारण या मोहिमेवर काम करणाऱ्या पथकानं अद्याप विलंब होण्याबद्दल कोणतेही संकेत दिलेले नाहीत,” असं इस्रोच्या अधिकाऱ्यानं ‘पीटीआय’शी बोलताना सांगितलं.

 

News English Summary: The lockdown, which was imposed to prevent the spread of the corona, is likely to hit India’s first unmanned mission, the Gaganyan mission. The Indian Space Research Organization is currently working on the Mission Gaganyan mission. Preparations for the operation are currently underway, with ISRO officials saying the operation could be delayed due to a lockdown.

News English Title: First Trial flight of Gaganyaan may face some delay due to lockdown ISRO News Latest Updates.

हॅशटॅग्स

ISRO(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x