3 May 2024 12:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | अशी संधी सोडू नका! IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
x

१४ जूनच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं महाराष्ट्र सैनिकांसाठी पत्र

Raj Thackeray, Birthday, Maharashtra Sainik

मुंबई, १२ जून : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जूनला वाढदिवस असतो. पण कोरोनाच्या परिस्थतीमुळे यंदा वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यायला येऊ नये, असा आदेश दिला आहे. त्याऐवजी आहे तिथेच जनतेला मदत करा, अशा सूचना देणारं जाहीर पत्रच कार्यकर्त्यांना उद्देशून राज यांनी लिहिलं आहे.

जोपर्यंत कोरोना आजारावर योग्य औषध सापडत नाही तोपर्यंत आपल्याला व त्याच्यासोबत जगण्याची तयारी मनाने करावी लागेल. सध्या एकूणच महाराष्ट्राने तशी तयारी केलेली दिसते. गेल्या २,३ महिन्यांच्या काळात येणाऱ्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या होत्या. फक्त त्यात एकच दिलासा देणारी बाब माझ्यासाठी असायची ती म्हणजे ह्या कठीण प्रसंगात माझा महाराष्ट्र सैनिक जीवावर उदार होऊन, मोठया प्रमाणावर पदरमोड करून लोकांच्या मदतीला धावून जात होता. अन्नधान्य वाटपापासून ते रुग्णांना इस्पितळात बेड मिळवून देणारा, रुग्णांच्या कुटुंबियांना धीर देऊन प्रत्येकाच्या गरजेला उभा राहणारा. माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहचायच्या आणि त्या ऐकताना मला एकाच वेळेस आनंद आणि अभिमान दोन्हीही रहायचा, असे ठाकरे यांनी म्हटले.

काय आहे सविस्तर पत्र;

 

News English Summary: MNS president Raj Thackeray’s birthday is on June 14. However, due to Corona’s condition, it is not appropriate to celebrate his birthday this year, Raj Thackeray said, adding that he should not come to wish his party workers.

News English Title: Do not Come To Wish Me On My Birthday Raj Thackerays Letter To Party Workers News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x