26 April 2024 12:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम
x

फ्रान्समधील बिघडलेल्या कोरोना परिस्थितीची जवाबदारी स्वीकारून पंतप्रधानांचा राजीनामा

France PM Edouard Philippe, Resigned, due to corona virus crisis

पॅरिस, ३ जुलै : फ्रान्सचे पंतप्रधान एडवर्ड फिलिप यांनी कोरोना व्हायरसमुळे राजीनामा दिला आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारमध्ये ते मागील ३ वर्षांपासून पंतप्रधान होते. फ्रान्समधील कोरोना व्हायरसमुळे आलेल्या आर्थिक संकटाच्या कारणामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरू आहे की, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे मंत्रिमंडळात फेरबदल करू शकतात. हे फेरबदल अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनची स्वतःची विश्वासार्हता वाढवणार होते आणि पुन्हा निराश झालेल्या मतदारांची मने जिंकतील. कोरोना संकटाच्या वेळी पंतप्रधान एडवर्ड फिलिप यांच्यावर जोरदार टीका देखील झाली होती.

कोरोना व्हायरसने फ्रान्समध्ये हाहाकार माजवला होता. या साथीत 29875 लोकांचा बळी फ्रान्समध्ये गेला. Coronavirus चा फ्रान्समधला मृत्यूदर आतापर्यंत जगभरातला सर्वाधिक ठरला. कोरोनाचा संसर्ग झालेल्या प्रत्येत 100 पैकी 17 हून अधिक नागरिकांचा या आजारात जीव गेला. त्यामुळे फ्रान्समध्ये मोठी दहशत पसरली आणि आधीच आर्थिक गर्तेत अडकलेला देश ठप्प झाला.

अजूनही फ्रान्सला आर्थिक संकटातून बाहेर येण्याचा मार्ग सापडलेला नाही. या कारणाने एडवर्ड फिलीप यांनी राजीनामा दिला. तो राष्ट्राध्यक्षपदी असणाऱ्या त्यांच्या पक्षाच्या इम्युनेल मॅक्रॉन यांनी तातडीने स्वीकारला. मॅक्रॉन यांना स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा सुधारण्याची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी तातडीने फिलीप यांचा राजीनामा मंजूर केल्याची चर्चा आहे. पुढच्या काही तासांत मॅक्रॉन फ्रान्सच्या नव्या पंतप्रधानांचं नाव घोषित करतील. पुढच्या 2 वर्षांसाठी फ्रान्सला आता नवा पंतप्रधान मिळेल.

 

News English Summary: Prime Minister Edward Philippe has resigned as France could not recover from the collapse of COVID-19. He was the Prime Minister for the last 3 years. President Emmanuel Macron has approved Philip’s resignation.

News English Title: France PM Edouard Philippe has resigned due to corona virus crisis in France News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x