3 May 2024 12:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

लोकांच्या तीव्र विरोधानंतर अखेर २ किमीची अट राज्य सरकारकडून रद्द

Maharashtra government, revoked the condition, Mumbai police, Allow travel, two kilometers

मुंबई, ४ जुलै : कोरोना विषाणूचा झपाट्याने शहरात फैलाव होत आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोन असलेल्या ठिकाणी कडक लॉकडाऊन करण्याची मुभा देण्यात आली होती. दोन किमी परिसरात नागरिकांनी खेरदी करावी, अशी अट लागू करण्यात आली होती. मात्र, विरोधानंतर घरापासून दोन किलोमीटर परिसरातच प्रवासमुभा देण्याबाबत फेरविचार करुन लागू करण्यात आलेली अट रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकारने शुक्रवारी ही अट रद्द करून घराजवळच खरेदी करण्याचे आवाहन केले. पोलिसांनाही त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही पोलिसांच्या या कृतीबद्दल आक्षेप घेतल्यावर घराजवळच खरेदी करा, असे आवाहन मुंबई पोलीस आयुक्तांनी केले, तर दोन किमीची अट रद्द केल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. ठाणे जिल्ह्य़ात पुन्हा टाळेबंदी लागू करणे, मुंबईत घरापासून दोन किमीच्या आत प्रवासास मुभा देणे आणि कोणतीही पूर्वसूचना न देता वाहन चालकांच्या विरोधात कारवाई करणे यावरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याबाबत पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.

 

News English Summary: After the protest, the condition of traveling within two kilometers of the house has been reconsidered and the condition imposed has been canceled. The state government on Friday revoked the condition and appealed for a purchase near the house.

News English Title: Maharashtra government revoked the condition of the Mumbai police to allow travel within two kilometers News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x