3 May 2024 6:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

वसई-विरार महापालिका आयुक्तांवर अविनाश जाधव का संतापले? सविस्तर वृत्त

MNS Avinash jadhav, Vasai Virar Municipal Commissioners, Covid Care Center

वसई, १४ जुलै : वसई विरार महापालिकेला तीन महिन्यांनी पूर्ण वेळ आयुक्त मिळाले होते. धुळ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी असलेल्या डी. गंगाथरन यांची एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली हप्ते. मार्च महिन्यात धुळे जिल्ह्यातील निवडणुकीमुळे गंगाथरन यांच्या नियुक्तीला स्थगिती मिळाली होती.

वसई विरार महापालिकेचे आयुक्त बी.जी. पवार डिसेंबर २०१९ मध्येच सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर पूर्णवेळ आयुक्त मिळाले नव्हते. वसई विरार महापालिकेचा अतिरिक्त कार्यभार पालघर जिल्ह्यचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. पूर्णवेळ आयुक्त नसल्याने विकास कामांवर परिणाम होत होता शिवाय धोरणात्मक निर्णय घेता येत नव्हते. अखेर ७ एप्रिल २०२० रोजी मुख्यमंत्र्यानी तातडीने वसई-विरार महापालिकेचे रिक्त असलेले आयुक्तपद भरण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा डी गंगाथरन यांची नियुक्ती केली.

डी गंगाथरन यांनी वसई विरार महापालिकेचा कारभार स्वीकराला तेव्हा कोरोनासारख्या महामारीचा प्रकोप सर्वत्र वाढत चालला होता आणि आजही तो वसई विरार मध्ये सुरूच आहे. रुग्णसंख्या आटोक्‍यात आणण्याचे मोठे आव्हान सर्वच महापालिका प्रशासनासमोर आहे. त्यावेळी कोरोनाशी लढण्यासाठी महापालिका त्यासाठी सज्ज आहे, अशी ग्वाही त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली होती.

पुढे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अत्यंत महत्वाचं विधान केलं होतं. कारण महापालिका प्रशासन लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन काम करत नाही, अशीही एक चर्चा रंगली आहे. त्याबाबत स्पष्टीकरण देताना आयुक्त म्हणाले होते की, मी नव्यानेच पालिकेत रुजू झाल्याने अद्याप स्थानिक लोकप्रतिनिधींच्या फारसा संपर्कात आलेलो नाही. मात्र, कोरोनावर मात करण्याबाबतच्या त्यांच्या सूचनांचा आदरच केला जाईल. त्यांच्याशी चर्चा करायला मी कधीही उपलब्ध आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नक्कीच एकत्र काम करू असं म्हटलं होतं. मात्र त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून ते त्यांच्या विधानाच्या नेमकं विरुद्ध वागत असल्याचा सर्वांचा अनुभव आहे.

केवळ राज्यातील सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधींना ते भेटतात, मात्र इतर पक्षातील प्रतिनिधींना ते अजिबात जुमानत नाहीत असा सर्वच विरोधी पक्षातील प्रतिनिधींचा अनुभव आहे. सत्ताधाऱ्यांच्या प्रतिनिधींना खुश ठेवण्यावर त्यांचा अधिक भर असतो. सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी १२-१५ जण एकत्र आल्यास देखील ते विनाअट भेट देतात. मात्र कोरोना संबंधित विषयाला अनुसरून विरोधी पक्षातील प्रतिनिधी काही अडचणी घेऊन आल्यास भेटताना अटी घालतात आणि बोलण्यात उर्मटपणा दाखवतात हाच अनुभव झाला आहे. आज मनसेचे ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव त्यांच्या स्थानिक ७-८ प्रतिनिधींना घेऊन गेले असता तोच प्रकार घडला. काही वेळापूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी घोळक्याने भेट घेऊन गेलेले असताना, मनसेच्या केवळ दोनच लोकांना आत पाठवा अशी अट घातली, अन्यथा भेट देणार नाही असा संदेश पाठवला.

स्थानिक कोविड सेंटरमध्ये सुविधाच उपलब्ध नसल्याने रुग्णांचे अत्यंत हाल होत आहेत. त्यासाठी स्थानिक मनसे प्रतिनिधींनी फोटो पुराव्यांसहित आयुक्तांची भेट घेण्यास गेले, जेणे करून रुग्णांचे प्रश्न मांडता येतील आणि त्यांना प्राथमिक सेवा उपलब्ध होतील. मात्र आयुक्तांना स्वतःच्या क्षेत्रातील कोविड सेंटरमधील दुरावस्थतेचे पुरावे आणल्याने राग आल्याचं पाहायला मिळालं. परिणामी त्यांनी भेट देणं टाळलं आणि भेटायचं तर दोघांनीच या असं ठणकावलं. त्यामुळे अविनाश जाधव संतापले आणि आयुक्तालयातच कोविड सेंटरच्या दुरावस्थतेचे फोटो लावले. मात्र ते फोटो लावत असताना देखील आयुक्त आतून अविनाश जाधव यांना दमबाजी करत होते, पण त्यांचा उर्मटपणा ते कॅबिनमध्ये असल्याने कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला नाही. त्यामुळे आयुक्तांना ना लोक प्रतिनिधींशी संवाद साधायचा आहे, ना कोरोना सेंटरमधील दुरावस्थेला समजून घ्यायचं आहे असंच चित्र आहे. इथे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री, राज्यांचे सचिव देखील लोक प्रतिनिधींना भेटत असताना वसई विरारचे महापालिका आयुक्त डी गंगाथरन मात्र आयुक्तालयातील एसीच्या थंड हवेत देखील गरम डोक्याने परिस्थिती हाताळत असल्याने शहरातील प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

News English Summary: It is said that the announcement made on Tuesday was made out of this anger. Meanwhile, Municipal Commissioner Gangadharan has said that he will lodge a formal complaint with the police against the activists

News English Title: Sloganeering From MNS At Outside The Vasai Virar Municipal Commissioners Office Used Abusive Language News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x