27 April 2024 4:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

मी काही यातला तज्ज्ञ नाही आणि WHO सुद्धा माझ्याकडून सल्ले घेत नाही - राज ठाकरे

WHO, World Health Organization, CM Uddhav Thackeray

मुंबई, ३१ जुलै : “सरकारकडून लावलेले निर्बंध, टेलिव्हिजनवरील बातम्या आणि व्हॉट्सअॅपवरचे मेसेज यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहेत. काळजी घेणं गरजेचं आहे पण घाबरुन घरात बसणं योग्य नाही. लोकांना मानसिक विवंचनेतून बाहेर काढायला हवं. त्यामुळे सगळ्या गोष्टी पूर्ववत करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. काळजी घ्या, पण शटडाऊन आणि लॉकडाऊन नको, असंही ते म्हणाले. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्र सरकारने अनलॉक- 3 च्या गाईडलाईन जारी केल्यानंतर राज्य सरकारनेही गाईडलाईन जारी केल्या आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

दरम्यान, लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय चुकला का?, या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मी काही यातला तज्ज्ञ नाही आणि डब्ल्यूएचओही माझ्याकडून काही सल्ले घेत नाही. परंतु, मी सुरूवातीला डॉक्टरांशी बोललो होतो. त्यांचं म्हणणं होतं की, सुरूवातीच्या काळातच कडक लॉकडाउन पाळणं गरजेचं होतं. ते पाळलं गेलं नाही. आता ही गोष्ट आपल्या हाताबाहेर गेली आहे. मी मंत्रालयात बैठकीला गेल्यानंतर म्हणालो होतो की, आपल्याला या विषाणूंसोबत जगायला शिकावं लागेल,” असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

 

News English Summary: I am not an expert in this and the WHO does not take any advice from me. But, I had initially talked to the doctor. He said that strict lockdown was required in the early days.

News English Title: I am not an expert in this and the WHO does not take any advice from me said Raj Thackeray News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x