26 April 2024 1:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा
x

अरे कशाचा दाऊद..दाऊद करत बसलास | अजित पवारांची पत्रकाराला खोचक प्रतिक्रिया

Dawood Ibrahim, Deputy CM Ajit Pawar, Answer To Journalists

मुंबई, २३ ऑगस्ट: कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा, अशी विनंती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करुन ही मागणी केली आहे.

“दाऊद इब्राहीम कराचीत असल्याचं पाकिस्तानं कबूल केलं आहे. त्याला भारतात आणण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करा, अशी मी पतंप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो. दाऊदला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, भारताला हवा असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये नसल्याचे रविवारी पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले. यावर पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी भन्नाट उत्तर दिलं.

दाऊदबाबत पाकिस्तानने केलेल्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “अरे कशाचा दाऊद…दाऊद करत बसलास! दाऊदबाबत काहीतरी कोणीतरी टीव्हीला दाखवत होते. आपल्याकडील वातावरण खराब करण्याचं काम त्या टोळीनं केलं आहे. यावर केंद्र आणि संबंधित अधिकारी चर्चा करतील आणि त्याला आणण्याचा निर्णय घेतील. यावर निर्णय घेण्यात ते सक्षम असून आम्ही त्यावर वक्तव्य करणं बरोबर नाही.”

 

News English Summary: Pakistan on Sunday clarified that the underworld don Dawood Ibrahim, who is wanted by India, is not in Pakistan. Ajit Pawar replied to the question asked by the journalists in Pune.

News English Title: What Are Saying Dawood Dawood Deputy CM Ajit Pawars Answer To The Journalists Question News Latest Updates.

हॅशटॅग्स

#AjitPawar(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x