26 April 2024 7:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागतात - आ. नितेश राणे

BJP MLA Nitesh Rane, Uttar Pradesh Chatrapati Shivaji Maharaj Museum, CM Yogi Adityanath, Marathi News ABP Maza

मुंबई, १५ सप्टेंबर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी आग्र्यातील निर्माणाधीन मुघल संग्रहालयाचे (Agra Mughal Museum) नाव बदलण्याची घोषणा केली. हे संग्रहालय आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, असं ते म्हणाले. हे संग्रहालय ताजमहालच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ उभारले जात आहे. योगी सरकारच्या या निर्णयावर भाजपचे आमदार नितेश राणे आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक खास ट्विट केलं आहे.

“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत आहेत आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी महाराजांच्या वंशजाकडे पुरावे मागतात. दुर्देव ते आमचे !,” असं म्हणत नितेश राणे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा येथे निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल अशी घोषणा केल्यावर फडणवीस यांनी या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं आहे. “जय जिजाऊ, जय शिवराय ।। छत्रपती शिवाजी महाराज की जय! ” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांचा जयजयकार केला आहे. योगी आदित्यनाथ यांनी एक ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली. त्यांचं ट्विट फडणवीस यांनी रिट्विट केलं आहे.

 

News English Summary: Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath on Monday announced that the Mughal Museum in Agra will be henceforth known as Chhatrapati Shivaji Maharaj. CM Adityanath was reviewing the development work of Agra division through video conferencing and said that the Mughal Museum under construction in Agra will be built in the name of Chhatrapati Shivaji Maharaj.

News English Title:  BJP MLA Nitesh Rane Criticize Maharashtra Government Uttar Pradesh Chatrapati Shivaji Maharaj Museum Yogi Adityanath Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x