27 April 2024 12:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

नोटबंदीचा उद्देश अयशस्वी | चलनात २००० च्या सर्वाधिक बनावट नोटा | NCRB डेटा

Fake Currency, 2000 Rupees, Demonetization, PM Narendra Modi

नवी दिल्ली, २ ऑक्टोबर : केंद्र सरकारनं चार वर्षांपूर्वी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. चलनात असलेल्या बनावट नोटांपासून मुक्ती हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. त्यावेळी केंद्र सरकारनं ५०० आणि १ हजार रूपयांच्या नोटा बंद केल्या होता. त्यानंतर २ हजार रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. परंतु आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, गेल्या वर्षी जितक्या बनावट नोटा पकडण्यात आल्या त्यापैकी सर्वाधिक नोटा या २ हजार रूपयांच्या असल्याचं समोर आलं आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) वार्षिक अहलावातून ही माहिती मिळाली आहे.

इंग्रजी वृत्तपत्र ‘द हिंदू’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळविलेल्या डाटामध्ये असे म्हटले आहे की, २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये सर्वाधिक बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. एनसीआरबीच्या म्हणण्यानुसार, २०१९ मध्ये देशात एकूण २५.३९ कोटी रुपयांचे बनावट भारतीय चलन जप्त करण्यात आले. तर २०१८ मध्ये हा आकडा केवळ १७.९५ कोटी होता. सरकारी आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये दोन हजार रुपयांच्या एकूण ९०५६६ बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्यातील बहुतेक नोटा कर्नाटक, गुजरात आणि पश्चिम बंगालमधून जप्त करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशात नोटाबंदी लागू केली होती. ज्याअंतर्गत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्या होत्या. ही नोटाबंदी लागून करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे देशात काळा पैसा आणि बनावट नोटा चलनातून थांबविणे, असा होता. मात्र, आता चार वर्षांनंतरही पुन्हा बनावट नोटा चलनात आल्याचे दिसून येत आहे.

२५ ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या २०१९-२० च्या वार्षिक अहवालानुसार बँकेनं गेल्या आर्थिक वर्षात २ हजार रूपयांच्या एकाही नोटेची छपाई केली नाही. देशात सर्क्युलेशनमध्ये २ हजार रूपयांच्या नोटांमध्येही घट झाली आहे. २०१७०१८ मध्ये ३.५ अब्ज नोटा चलनात होत्या. तर २०१९-२० मध्ये त्यात घट होऊन २.७३ अब्ज इतक्या झाल्या आहेत. एनसीआरबीच्या अहवालानुसार गेल्या वर्षात १०० रूपयांच्या ७१ हजार ८१७ बनावट नोटा पकडण्यात आल्या. यापैकी सर्वाधिक म्हणजेच ३१ हजार ६७१ नोटा दिल्लीतून जप्त करण्यात आल्या होत्या. तर १६ हजार १५९ नोटा गुजरातमधून आणि ६ हजार १२९ नोटा उत्तर प्रदेशातून जप्त केल्या होत्या.

 

News English Summary: Four years after demonetization, the highest number of all counterfeit notes seized last year was in the denomination of ₹2,000, according to the National Crime Records Bureau’s (NCRB) annual Crime in India report. The data on seizures of counterfeit notes from all the States and Union Territories also shows there is a surge in seizure of fake Indian currency notes in 2019 compared to 2018.

News English Title: The Most Fake Currency In The Country Was 2000 Rupees The Government Brought After Demonetization Pm Narendra Modi Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x