5 May 2024 11:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी
x

VIDEO | पुलवामा हल्ला पाकिस्तान सरकारचे यश | घर मे घूस के मारा | पाकिस्तानची माहिती

Pakistan Minister Fawad Choudhary, Pakistan Hand In Pulwama, Terrorist Attack

इस्लामाबाद, २९ ऑक्टोबर: पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला इम्रान खान सरकारचे सर्वात मोठे यश असल्याचा स्वीकार पाकिस्तान सरकारमधील मंत्र्याने केला. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यामुळे पाकिस्तानचा दहशतवादविरोधी बुरखा पुन्हा एकदा फाटला आहे. इम्रान खान सरकारमध्ये मंत्री असलेले फवाद चौधरी यांनी याबाबत भाष्य करताना, ‘पुलवामा हल्ला पाकिस्तान सरकारचे यश असून याचे श्रेय पंतप्रधान इम्रान खान यांना द्यायला हवे’ असं वक्तव्य केलं.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केला होता. भारतातर्फे याबाबतचे अनेक पुरावे सादर करण्यात आले होते. मात्र पाकिस्तानने इतर दहशतवादी हल्ल्यांप्रमाणेच या हल्ल्यावेळीही पाकिस्तानचा याशी काहीही संबंध नसल्याचं म्हंटलं होत. मात्र फवाद चौधरींच्या वक्तव्यामुळे आता हा हल्ला पाकिस्ताननेच घडवून आणल्याचं स्पष्ट झालंय.

दरम्यान, भारतीय वायुसेनेचे पायलट अभिनंदन यांना सोडलं नसतं तर भारताने हल्ला केला असता असं पाकिस्तानच्या एका खासदाराने आजच म्हटलं होतं. मात्र पाकिस्तान हल्ल्यासाठी तयार होता असंही आता फवाद चौधरी यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानने कायमच आमचा देश हे दहशतवाद्यांचं नंदनवन नाही असं म्हटलं आहे. मात्र आज पाकिस्तानच्या मंत्र्यांनेच पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे. पाकिस्तानच्या संसदेत बोलताना गेल्यावर्षी भारतात झालेला पुलवामा हल्ला हे पाकिस्तान सरकारचं मोठं यश असल्याचं म्हटलं आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली हा हल्ला झाला आणि देशासाठी हे मोठं यश आहे असंही पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Pakistan was responsible for the terrorist attack in Jammu and Kashmir’s Pulwama last year in which 40 Indian paramilitary troopers were killed, a Pakistani minister has told the country’s legislature, in an apparent admission of the country’s role in sponsoring cross-border terrorism. “Humne Hindustan ko ghus ke maara (We hit India in their home). Our success in Pulwama, is a success of the people under the leadership of Imran Khan. You and we are all part of that success,” minister Fawad Chaudhury said in the national assembly.

News English Title: Pakistan Minister Fawad Choudhary Admitting Pakistan Hand In Pulwama Terrorist Attack News updates.

हॅशटॅग्स

#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x