26 April 2024 12:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम
x

सरकारकडून काही होताना दिसत नाही हे राज ठाकरेंनी देखील सांगितलं आहे | प्रवीण दरेकर

Raj Thackeray, MahaVikas Aghadi, BJP Leader Praveen Darekar

मुंबई, ३१ ऑक्टोबर: महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला होता.

यावरून विरोधीपक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांनी देखील उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, ‘मुख्यमंत्र्यांना भेटण्यापेक्षा राज्यपालांकडे लोक का जातात याचं आत्मपरीक्षण संजय राऊत यांनी करावे. राज ठाकरे यांनी देखील सांगितलं की सरकारकडून काही होताना दिसत नाही.’

‘सरकारकडून काही होत नाही त्यामुळे घटनात्मक पालकत्वाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्या राज्यपालांकडे जनता न्याय मागण्यासाठी जाऊ शकते. पंकजा मुंडे भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत त्यांच्या बद्दल संभ्रम निर्माण करणे योग्य नाही. शिवसेना मूळ प्रश्नांवर बगल देण्यासाठी रोज असे नवीन फंडे आणते आहे.’ असं देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

तत्पूर्वी, संजय राऊतांच्या या टीकेवर मनसेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांची घेतलेल्या भेटीचा फोटा ट्विट केला आहे. तसेच फोटो ट्विट करुन ‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’ असं म्हणत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, सर्वसामान्य जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीदरम्यान वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्यपालांना निवेदन देऊन केली होती.

 

News English Summary: Shivsena leader Sanjay Raut had lashed out at MNS president Raj Thackeray, saying that the government is a people-appointed government, a government elected by the people. Leader of Opposition Praveen Darekar has also replied to this. He said, ‘Sanjay Raut should introspect why people go to the Governor instead of meeting the Chief Minister. Raj Thackeray also said that nothing is happening from the government.

News English Title: Raj Thackeray also accepted that MahaVikas Aghadi government is not doing anything said BJP Leader Praveen Darekar News Updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x