26 April 2024 2:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर
x

VIDEO | मोदींनी गुजरातमध्ये विकास केला असा प्रचारात धिंडोरा | तरी मतदाराला पैसे वाटप

Gujarat, by poll voting, BJP Panna Pramukh, distributing money

गांधीनगर, ३ ऑक्टोबर : गुजरातच्या विकासाचा मॉडेल देश मागील दहा वर्षांपासून ऐकत आहे. मात्र आजही हा विकास विशाल पुतळ्यांच्या पुढे गेलेला नाही. स्वतः पंतप्रधान अनेक वर्ष गुजरातच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होते. दुसरीकडे ते आज स्वतः देशाचे पंतप्रधान आहेत आणि ते देखील दुसरी टर्म. मात्र आजही गुजरात देशातील सर्वच दृष्टीने अनेक राज्यांच्या मागे आहे हे वास्तव आहे. त्यामुळे विकासाचा अदृश्य मॉडेल आजही हरवलेला आहे, ज्याचा धिंडोरा केवळ निवडणूक आली की कानावर पडतो.

कारण विकास खरंच केला असता आणि राज्यातील मतदाराच्या मुलभूत गरज पूर्ण झाल्या असत्या तर आज निवडणुकीत भाजपवर पैशाचा वापर करण्याची गरज पडली नसती आणि तो विकास हरवल्यानेच निवडणुकांमध्ये मतदारांना पैसे वाटण्याची वेळ येते.

कारण गुजरातमध्ये ८ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान आज पार पडले. यावेळी अनेक मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार आणि गुजरात प्रभारी राजीव सातव यांनी केला आहे. त्याबाबतचा व्हिडिओ सातव यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केल्याने भाजपच्या विकासाचं मॉडेल सामोर आलं आहे.

भारतीय जनता पक्षाचे पन्ना प्रमुख नेमके काय करतात याचा पर्दाफाश या व्हिडिओत झाल्याचा दावा देखील सातव यांनी केला आहे. गुजरातमधील कर्जन मतदारसंघातील हा व्हिडिओ आहे. राज्याच्या निवडणूक आयोगानं याबाबत तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी सातव यांनी केली आहे.

काँग्रेस उमेदवार किर्तीसिंह जाडेजा यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अक्षय पटेल यांच्यावर मतांसाठी पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. अक्षय पटेल भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. गुजरातमध्ये आज विधानसभेच्या एकूण ८ जागांसाठी पोटनिवडणूक झाली आहे. यात वडोदऱ्यातील कारजान विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.

काय आहे नेमका व्हिडिओ;

 

News English Summary: The country has been listening to Gujarat’s development model for the last ten years. But even today, this development has not gone beyond the huge statues. The Prime Minister himself was the Chief Minister of Gujarat for many years. On the other hand, he is the Prime Minister of the country today and he is also in his second term. But even today, it is a fact that Gujarat lags behind many other states in the country. So the invisible model of development is still lost today, the rumble of which can only be heard when elections come.

News English Title: Gujarat by poll voting BJP Panna Pramukh distributing money for votes News Updates.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x