5 May 2024 1:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी
x

पोलीस व्हॅनमध्ये बचाओ-बचाओ बोंबलत होता | बाहेर आल्यावर नेल्सन मंडेला बनतोय

Congress leader Acharya Pramod, Arnab Goswami, Republic TV

नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर: वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींना देखील न्यायालयाने जामीन मजूर केला होता. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकी पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर तात्काळ सुटका करण्याचे आदेश देखील दिले होते.

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर अर्णब गोस्वामी हे आपल्या न्यूज रूममध्येही पोहोचले. यावेळी पुन्हा त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं. “उद्धव ठाकरे तुमचा पराभव झाला आहे,” असं देखील ते यावेळी म्हणाले. “उद्धव ठाकरे तुम्ही मला जुन्या प्रकरणात अटक केली आणि माझी माफीही मागितली नाही. खेळ तर आता सुरू झाला आहे,” असंही अर्णब गोस्वामी यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी, सुरक्षेच्या कारणावरून अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात पोलीस व्हॅनने घेऊन जात असताना संपूर्ण देशाने पाहिले होते. त्यावेळी धास्तावलेल्या अर्णब गोस्वामी यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचा कांगावा सुरु केला होता. विशेष म्हणजे त्याच वेळी ओरडत त्याने केंद्र सरकारने आणि सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये लक्ष घालावं अशी देखील ऑन कॅमेरा ओरड सुरु केली होती.

मात्र तुरुंगातून बाहेर पडताच त्याने तुरूंगाबाहेरच खुलेपणाने जल्लोष केल्याचा देखील देशाने पाहिलं आहे. तुरुंगात जीवाला धोका असल्याचा कांगावा करणारा अर्णब गोस्वामी तुरूंगाबाहेरच जल्लोष करताना स्वतःला नॅशनल हिरो असल्याचं भास निर्माण करू लागला आहे. त्यालाच अनुसरून आचार्य प्रमोद यांनी अर्नब गोस्वामी यांची खिल्ली उडवली आहे. या संदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे कि, ‘पोलीस व्हॅनमध्ये बचाओ-बचाओ बोंबलत होता, बाहेर आल्यावर नेल्सन मंडेला बनतोय.’

 

News English Summary: The country has also seen him openly chanting outside the jail as soon as he was released. Arnab Goswami, who has been claiming that his life is in danger in jail, has started pretending to be a national hero while protesting outside the jail. Accordingly, Acharya Pramod has ridiculed Arnab Goswami. In a tweet, he said, “There was a rescue bombing in the police van, and when it came out, it turned out to be Nelson Mandela.”

News English Title: Congress leader Acharya Pramod troll Arnab Goswami for his comment on Republic TV News updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x