26 April 2024 7:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

आधी शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी | आता आजींची खिल्ली उडवली | कंगनाचा मुजोरपणा उच्चांकावर

Kangana Ranaut, Fake news, Shaheen Bagh Dadi, farmers protest

मनाली, २९ नोव्हेंबर: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत अनेकदा विवादित, धार्मिक तसेच जातीय ट्विट करण्यासाठीच प्रसिद्ध होऊ लागली आहे. सध्या ती विवादित ट्विट करण्यात नव नवे उच्चांक गाठताना दिसत आहे. यापूर्वी तिने आंदोलक शेतकऱ्यांची तुलना थेट दहशतवाद्यांशी केली होती आणि तिच्यावर प्रचंड टीका झाली होती. आता पुन्हा एका वयोवृद्ध आजींवर टीका केल्याने ती नव्या वादात अडकली आहे. समाज माध्यमांवर तिला नेटिझन्सने धारेवर धरल्यावर तिने लगेच ट्विट डिलीट करण्याचा पराक्रम केला आहे.

सध्या तिला समाज माध्यमांवर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. कारण तिने वास्तव जाणून न घेताच शेतकरी आंदोलनातील एका फेक ट्विटला रिट्विट केलं होतं. ट्रोल झाल्यावर कंगनाने हे ट्विट लगेच डिलीट केलंय. मात्र लोकांना याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवला आणि आता तिला पुन्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली.

या आंदोलनातील एक आजी सध्या समाज माध्यमांवर चर्चेत आल्या असून अभिनेत्री कंगना रणौतने त्यांची तुलना शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली आहे. त्यामुळे कंगनावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. कंगनाने अलिकडेच या आजींसदर्भातील एक ट्विट शेअर केलं होतं. परंतु, त्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. समाज माध्यमांवर सुरु झालेल्या ट्रोलिंगनंतर कंगनाने तिचं हे ट्विट डिलीट केलं आहे. परंतु, सध्या ट्विटरवर #DaadiSeMaafiMangKangana हा हॅशटॅग जोरदार व्हायरल झाला आहे.

कंगनाने या आजीसंदर्भात ट्विट केल्यानंतर ते चुकीचं असल्याचं फॅक्ट चेकर ऑल्ट न्यूजचे प्रतिक सिन्हा यांनी सांगितलं. तसंच त्यात करण्यात आलेले दावेदेखील पूर्णपणे खोटे आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर समाज माध्यमांवर अनेकांनी कंगनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र एकूण कंगनाचा समाज माध्यमांवर उन्मत्तपणा प्रचंड वाढत असून, तिला विशिष्ट राजकीय पक्षाचं समर्थन मिळत असल्याने तिच्यातील मुजोरपणा उच्चांकावर पोहोचला असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

 

News English Summary: Bollywood actress Kangana Ranaut has become famous for her often controversial, religious as well as racial tweets. She is currently reaching new heights in controversial tweets. Earlier, she had compared agitating farmers directly to terrorists and had been heavily criticized. Now, once again, she is embroiled in a new controversy by criticizing an elderly grandmother. She has managed to delete the tweet as soon as netizens caught her on social media.

News English Title: Kangana Ranaut criticized for sharing fake news on Shaheen Bagh Dadi Participating in farmers protest news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x