27 April 2024 12:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

ग्लोबल टीचर पुरस्कार २०२० | सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा पुरस्कार

Solapur Zilla Parishad, teacher Ranjit Singh Disle, Global Teacher Award 2020, 7 crore rupees prize

सोलापूर, ३ डिसेंबर: शाळा ही पहिली गुरू आहे असं म्हणतात. शिक्षक शाळेत आलेल्या विद्यार्थ्याला घडवतात. विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले (Solapur ZP school teacher Ranjeet Singh Disle won Global Teachers award 2020) यांना 7 कोटी (7 crores Prize) रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

जगभरातील 140 देशांतील 12 हजारांहून शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केलेल्या कामाची दखल (Focus on innovative revolution not only in Maharashtra but also in the education sector of the country through QR coded books) घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या कामामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केलं आहे. यामुळे ९ देशांमधल्या हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जाईल. रणजितसिंह डिसले यांना मिळालेली रक्कम टीचर इनोव्हेशन फंडाकरता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: The school is said to be the first teacher. The teacher shapes the student who comes to school. Solapur Zilla Parishad teacher Ranjit Singh Disle has been awarded the Global Teacher Award of Rs 7 crore. He has been hailed as the best teacher in the world.

News English Title: Solapur Zilla Parishad teacher Ranjit Singh Disle has won Global Teacher Award 2020 with 7 crore rupees prize news updates.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x