27 April 2024 2:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

साहेब! नाहीतर पक्षाला त्याचा मोठा फटका बसेल

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुखांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असला तरी पक्षात जनतेतून निवडून येणारे लोकप्रतिनिधी आणि पक्षाच्या पाठींब्यावर निवडून येणारे राज्यसभा व विधानपरिषदेवरील नेते असे दोन गट पडल्याचे चित्र आहे. राज्यसभेवरील खासदार भाजपाविरोधात आक्रमक होत आहेत तर जनतेतून निवडणून येणारे खासदार पक्ष नैतृत्वाला युतीचा पुनर्विचार करण्याची गारानी मांडत आहेत.

लोकसभेच्या एका खासदाराने नाव उघड न करण्याच्या अटीवर काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. ते म्हणाले की, २०१४ मध्ये मोदी लाटेचा शिवसेनेला फायदा झाला हे स्पष्ट आहे. कारण आम्ही निवडणुकीनंतर भाजप सोबत जाणार त्यामुळेच आमची मत वाढली आणि एकूण खासदारांची संख्या सुद्धा. मोदी लाटेमुळे आमचे तब्बल १८ खासदार निवडून आले होते.

यंदा मोदी लाटेचा तसा प्रभाव नसेल हे स्पष्ट आहे. त्यामुळे होणार नुकसान जर मर्यादित ठेवायचे असेल तर भाजप सोबत युती केल्याशिवाय गत्यंतर नाही असं आम्ही पक्ष प्रमुखांना कळवलं आहे. तसेच जर भाजप सोबत युती न झाल्यास शिवसेनेला लोकसभेच्या अवघ्या ५ – ६ जागाच हाती लागतील हे आम्ही पक्ष नैत्रुत्वाच्या ध्यानात आणून दिल आहे.

पालघर निवडणुकीत सर्व शक्ती पणाला लावून सुद्धा शिवसेनेचा पराभव झाला आणि भाजप विजयी झाली हे वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे असं या खासदारांच्या गटाचं म्हणणं आहे. युती न झाल्यास भाजपचं मोठं नुकसान होईल हे खरं असलं तरी शिवसेनेचा त्यात फायदा काय ? असं शिवसेनेतील अनेक खासदार बोलून दाखवत आहेत. २०१९ मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याने सेनेच महत्व वाढून महत्वाची खाती पदरात पाडून घेता येतील असं त्यांना वाटत.

पक्षातील हे दोन मतं प्रवाह पक्ष नैतृत्वासमोर अनेक प्रश्न चिन्हं उपस्थित करत आहेत. परंतु राजकीय विश्लेषकांच्या मते शिवसेनेने आधीच विरोधी पक्षात बसून भाजपला कडवा विरोध केला असता तर ते त्यांच्या फायद्याचं झालं असत. परंतु सत्तेत राहून विकासशुन्य कारभार करून केवळ भाजपला विरोध करण्यात संपूर्ण कार्यकाळ खर्ची घातल्याने शिवसेनेने विश्वासहर्ता गमावली आहे असं अनेकांना वाटत. आता परिस्थिती अशी आहे की, शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर अनेक मोठे नेते भाजपच्या गळाला लागतील आणि सेनेचंच मोठं नुकसान होईल याची पूर्ण कल्पना शिवसेनेच्या पक्ष नैतृत्वाला असल्याचं राजकीय जाणकार बोलून दाखवत आहेत.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x