27 April 2024 5:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

भाजप IT सेल प्रमुख आणि फडणवीसांकडून अशी धूळफेक | हा होता घटनाक्रम | फक्त संभ्रम

Anil Deshmukh, Sharad Pawar, Devendra Fadnavis

मुंबई, २२ मार्च: अ‍ॅलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधून सोमवारी (१५ फेब्रुवारी २०२१) ला डिस्चार्ज घेतल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रथम पत्रकार परिषद जाहीर केली त्यानंतर रद्द केली आणि त्यानंतर पुन्हा ‘अनौपचारिकपणे’ ती आयोजित केल्याने वाद निर्माण झाला होता. कोविड मधून बरे होत रिपोर्ट नॉर्मल आल्याने अनिल देशमुख यांना घरी विलगीकरणात होते. मात्र त्यावेळी शेतकरी आंदोलनावरून देशातील मोठ्या प्रतिष्ठित रिहाना ट्विट वादावरून उत्तर दिल्या नंतर मोठं वादळ निर्माण झालं होतं.

त्यावर राज्य सरकारने याबद्दल बोलताना प्रकरणामध्ये देशातील भारतरत्नांवर राजकीय दबाव टाकून त्यांना ट्विट करण्यास भाग तर पाडलं नाही ना याची चौकशी केली जाऊ शकते असं म्हटलं होतं. त्यानंतर पुन्हा अजून एक वादळ निर्माण झालं होतं. मात्र नेमक्या त्याच काळात अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याने प्रसार माध्यमांना त्याचाशी संपर्क करता आला नव्हता. त्यामुळे त्यांचे रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर आणि त्यांनी ११ दिवसांचा बंधनकारक काळ पूर्ण केल्याने त्यांना हॉस्पिटल डिस्चार्ज मिळताच मिडियाने त्यांना बोलण्यासाठी आणि भेटण्याचा आग्रह धरला.

याबद्दल बोलताना अनिल देशमुख म्हणाले होते की, “एक दिवस अगोदरच पत्रकार त्यांना फोन करत होते पण त्यांनी कोणालाही भेटण्यास नकार दिला होता. मी वारंवार भेटण्यास नकार दिला होता, पण तरीही काही मीडियाकर्मी माझ्याशी बोलू लागले,” कोविडबद्दल नकारात्मक चाचणी घेतल्यानंतरच ते रुग्णालयातून बाहेर आल्याचे त्यांनी सांगितले होते.

याबद्दल रूग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले होते की अनिल देशमुख हे ११ दिवस रुग्णालयात दाखल केले होते आणि ते कोरोनाव्हायरसच्या मेडिकल सूचनेनुसार अधिक होतं. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन मार्गदर्शक सूचनांनुसार, कोविड आजाराची हलक्या प्रकारची लक्षणे दिसण्याच्या दिवसापासून 10 दिवस संसर्ग होतं असतो. त्यांची आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर काही दिवसांनी देशमुख यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. आणि संसर्ग झाल्याच्या ११ व्या दिवसानंतर त्यांना इस्पितळातून सोडण्यात आले.

अखेर सोमवारी सकाळी ९:२७ वाजता माध्यमांच्या अधिकृत गटातकडे संदेश आला की दुपारी १२.३० वाजता गृहमंत्री मंत्री डिस्चार्जनंतर पत्रकार पत्रकारांशी बोलतील. मात्र त्याच दिवशी पुन्हा सकाळी ११:38 वाजता त्यांचे खाजगी सचिव योगेश कोठेकर यांनी एक संदेश पोस्ट केला. गृहमंत्र्यांच्या पत्रकार बैठकीसाठी माध्यमांनी रुग्णालयात न येण्याची विनंती त्यात करण्यात आली केली. तसेच गरज भासल्यास काही माहिती किंवा विधान नंतर शेअर केले जाईल असे त्यांनी नमूद केले. मात्र माध्यमांनी तगादा लावला आणि रिपोर्ट नॉर्मल आल्याने त्यांनी एक सोशल डिस्टन्स राखत पत्रकार परिषद घेतली होती.

त्याचाच व्हिडिओ फडणवीसांनी पूर्ण विषय समजून न घेता शेअर केला आणि प्रश्न उपस्थित केले. परमबीर सिंग यांच्या आरोपानुसार मूळ विषय होता की अनिल देशमुख १५ फेब्रुवारीला मुंबईत होते की नागपुरात. पण ज्या व्हिडिओमध्ये भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचा उल्लेख होता आणि त्यांची चौकशी होणार होती त्यामुळे ते आजच्या पत्रकार परिषदेनंतर सर्वात पहिले तापले आणि १५ तारखेचा व्हिडिओ शेअर करत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं आहे. खालील व्हिडिओ मध्ये नीट ऐका….त्यात देशमुखांनी कोणाच्या चौकशीबद्दल सांगितलं होतं. यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडियाने सविस्तर वृत्त त्याच तारखेला प्रसिद्ध केलं होतं. ते खात्री करण्यासाठी येथे क्लिक करून वाचू शकता

 

News English Summary: After being discharged from Alexis Multi speciality Hospital on Monday (February 15, 2021), Home Minister Anil Deshmukh first announced the cancellation of the press conference and then rescheduled it “informally”. Anil Deshmukh was isolated at home as reports of recovery from Covid returned to normal. But at the time, a big storm had erupted after the country’s most prestigious Rihanna responded to the tweet controversy over the farmers’ movement.

News English Title: After being discharged from Alexis Multi speciality Hospital on Monday February 15 Anil Deshmukh press conference news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x