27 April 2024 8:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

मनसुखच्या मृत्यूचा तपास NIA ला सोपवावा | सेशन कोर्टाचा ATS ला आदेश

ATS, NIA, Mansukh Hiren, Antilia case

मुंबई, २४ मार्च: अँटिलिया प्रकरणासंबंधीत मनसुख हिरेनच्या मृत्यूच्या प्रकरणात ठाणे सेशन कोर्टाने बुधवारी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला (ATS) आदेश दिला की, या प्रकरणाचा तपास थांबवून हा राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)ला सोपवावा. या प्रकरणात एनआयएने कोर्टाला अपील केले की केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतरही एटीएसने त्याकडे तपास हस्तांतरित केला नाही.

दुसरीकडे अँटिलिया तपासमध्ये NIA ला सलग नवीन पुरावे सापडत आहेत. दोन दिवसांपूर्वीच एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये छापेमारी करण्यात आली. या दरम्यान CCTV च्या तपासात समोर आले की, निलंबित API सचिन वाझे ज्या काळात या हॉटेलमध्ये थांबलेले होते, त्या दरम्यान एक महिला त्यांना भेटण्यासाठी आली होती. या महिलेजवळ नोटा मोजण्याचे मशीन होते.

NIA ला संशय आहे की, ही महिला वाझेंच्या जवळची व्यक्ती आहे, यामुळे महिलेचा तपास सुरू केला आहे. NIA ला संशय आहे की, ही महिला या संपूर्ण कटामध्ये सहभागी असू शकते. दुसरीकडे महाराष्ट्र ATS’ने याबाबतीत संपूर्ण तपास पूर्ण केल्याचं म्हटलं होतं तसेच या तपासात मोठी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं होतं.

 

News English Summary: The Thane Sessions Court on Wednesday directed the Maharashtra Anti-Terrorism Squad (ATS) to suspend its probe into the death of Mansukh Hiren in the Antilia case and hand it over to the National Investigation Agency (NIA). In this case, the NIA appealed to the court that the ATS did not transfer the investigation to it even after the order of the Union Home Ministry.

News English Title: ATS to suspend its probe into the death of Mansukh Hiren in the Antilia case and hand it over to the NIA order Thane Sessions Court news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x