26 April 2024 2:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर
x

HSC Board Exams 2021 | 3 एप्रिलपासून 12'वी च्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट ऑनलाईन उपलब्ध

HSC board exam 2021, hall tickets, 2th standard

मुंबई, ०२ एप्रिल: महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 12 वी च्या विद्यार्थ्यांना 3 एप्रिलपासून परीक्षेचे हॉलतिकीट ऑनलाईन उपलब्ध येणार आहे. सर्व कनिष्ठ महाविद्यालयं महाराष्ट्र राज्य बोर्डच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावरुन हॉलतिकीट डाऊनलोड करु शकतील. यासाठी त्यांना शाळा/महाविद्यालयांचा लॉगईन आयडी (Login ID) वापरावा लागेल. हॉलतिकीट डाऊनलोड करण्यास कोणतेही अडचण आल्यास शाळा किंवा महाविद्यालयं त्यांच्या विभागातील बोर्ड ऑफिसशी संपर्क करु शकतात. सर्व शाळा/महाविद्यालयांना 12 वीच्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट प्रिंट करुन विद्यार्थ्यांना हॉलतिकीटचे मोफत वाटप करणे अनिवार्य आहे. सर्व हॉलतिकीटवर शाळा किंवा महाविद्यालयाच्या मुख्यध्यापकांची स्वाक्षरी असणे देखील बंधनकारक आहे.

हॉलतिकीटमध्ये विषय किंवा माध्यमाची दुरुस्ती असल्यास शाळा/महाविद्यालयांनी त्वरीत बोर्डाच्या ऑफिसशी संपर्क साधावा. तसंच हॉलतिकीटवर विद्यार्थ्यांच्या नावाचे, फोटोग्राफचे किंवा स्वारक्षीची दुरुस्ती असल्यास शाळा किंवा महाविद्यालयाने ते बदल करुन हॉलतिकीटची कॉपी बोर्डाकडे सुपूर्त करावी.

एखाद्या विद्यार्थ्याकडून हॉलतिकीट हरवल्यास शाळा/महाविद्यालयाने हॉल तिकीटची पुन्हा प्रिंट घेऊन त्यावर लाल रंगाचा ड्युप्लिकेट शेरा मारुन विद्यार्थ्यास देण्यात येईल. हॉलतिकीटवर छापित डिजिटल फोटोग्राफ डिफेक्टीव्ह असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा सुधारीत फोटो लावून मुख्यध्यापकांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक आहे.

दरम्यान, राज्यात 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान 12 वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. मात्र सध्याच्या कोविड-19 परिस्थितीत त्यात काही विशेष बदल करण्यात आले आहेत. त्यासंबधित माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.

दहावी-बारावीची लेखी परीक्षा एप्रिल-मेमध्ये आहे. काेराेनामुळे यंदा दहावीचे विज्ञान प्रात्यक्षिक घेतले जाणार नाही. बारावीचे प्रात्यक्षिक मर्यादित स्वरूपात घेतले जाईल, अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली. राज्य मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचीप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी प्रात्यक्षिकावर आधारित विशिष्ट लेखनकार्य, प्रकल्प, प्रात्यक्षिक वही अथवा गृहपाठ यांचा समावेश असेल. हे प्रात्यक्षिक २१ मे ते १० जूनदरम्यान विद्यार्थ्यांकडून शाळांनी जमा करून घ्यायचे आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयासाठी प्रकल्पाकरिता २ गुण, प्रात्यक्षिक वहीकरिता २ गुण, गृहपाठ ६ गुण असे एकूण दहा गुण असणार आहेत. २५ टक्के कमी केलेल्या अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिके वगळून उरलेल्या प्रात्यक्षिकांपैकी किमान प्रात्यक्षिकाचा सराव घेऊन त्यावर आधारित ३० गुणांचे एक प्रात्यक्षिक घेण्यात यावे, असेही मंडळाने म्हटले.

 

News English Summary: Maharashtra State Board 12th standard students will get the exam ticket online from April 3. All junior colleges can download Holtikit from the official website of Maharashtra State Board www.mahahsscboard.in. For this they have to use the login ID of the school / college.

News English Title: HSC board exam 2021 hall tickets will be available online for 12th standard students from 3rd April news updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x