26 April 2024 4:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

'मोदी भाषण रोको आक्सीजन नहीं' ट्विटर ट्रेंड नंतर मोदींचा उद्याचा प. बंगला दौरा रद्द

PM Narendra Modi

नवी दिल्ली, २२ एप्रिल: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ऑक्सीजन पुरवठ्याबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. यात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिली की राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यात कोणताही अडथळा येऊ नये. देशाची सद्यस्थिती लक्षात घेऊन उत्पादन आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याच्या पध्दतींवरही ते बोलले. देशातील 6 उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयातही ऑक्सिजनच्या विषयावर सुनावणी होत आहे. दरम्यान, ऑक्सिजन पुरवठा करणारी वाहने न थांबवण्याचे आदेश गृह मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत.

दरम्यान, देशात कोरोना आपत्तीचा स्फोट झालेला असताना दुसऱ्या बाजूला कोरोना संबंधित औषधं, ऑक्सिजन आणि लसीचा देखील मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असून देशातील सर्वच राज्य सरकार प्रचंड तणावाखाली असल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे आज पश्चिम बंगालमधील सहाव्या टप्प्याचं मतदान पार पडलं आहे. त्यानिमित्ताने मोदींनी देखील ट्विट केलं. मात्र काही वेळाने मोदींना लक्ष करताना #मोदी_भाषण_रोको_आक्सीजन_नहीं असा जोरदार ट्रेंड ट्विटरवर सुरु झाला आहे.

विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये अजून दोन टप्य्यातील प्रचार आणि मतदान शिल्लक आहे. देशात दबाव वाढू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ उद्याचा पश्चिम बंगला दौरा कोविड संबंधित बैठकीच्या निमित्ताने रद्द केल्याचं ट्विट केलं आहे. यासंदर्भात मोदींनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “उद्या कोविड संबंधित उच्चस्तरीय बैठकीमुळे मी उद्याचा प. बंगाल दौरा रद्द करत आहे’.

 

News English Summary: PM Narendra Modi has cancel tomorrows West Bengal visit due to chairing high level meetings to review the prevailing COVID 19 situation in India news updates

News English Title: PM Narendra Modi has cancel tomorrows West Bengal visit due to chairing high level meetings to review the prevailing COVID 19 situation in India news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x