14 May 2024 11:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

कोरोना आपत्ती | मुंबई काँग्रेसकडून कोविड टास्क फोर्स टीमची स्थापना | संपर्क क्रमांक जाहीर

Maharashtra, Corona Pandemic

मुंबई, २३ एप्रिल: राज्यात गुरुवारी कोरोनाचे ६७,०१३ नवे रुग्ण आढळले. यातील १५,७३२ विदर्भातील तर मराठवाड्यातील ७८०० रुग्णांचा समावेश आहे. राज्यात एकूण ५६८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून यात विदर्भाचे २५९ आणि मराठवाड्याचे १६६ रुग्ण आहेत.

मराठवाड्यात ७८०० पॉझिटिव्ह, १६६ मृत्यू : मराठवाड्यात गुरुवारी ७८०० रुग्ण, १६६ मृत्यू झाले. ७१ हजार ०५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. संख्या अशी : औरंगाबाद १४५८ (३०), जालना ५५१ (१०), परभणी १२२० (१९), हिंगोली ३३९ (६), नांदेड १०९९ (२७), लातूर १२६९ (३८), उस्मानाबाद ७१९ (२१), बीड ११४५ (२१ मृत्यू). दरम्यान, राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत देखील सामान्य लोकं बिकट परिस्थितीचा सामना करत आहेत.

याच विषयाचं गांभीर्य लक्षात घेता मुंबई काँग्रेसने एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. मुंबईतील सर्व लोकसभा मतदारसंघात रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी सुसज्ज अशा अँब्युलंस उपलब्ध केल्या आहेत. यासुविधेसाठी सामान्य लोकांसाठी संपर्क क्रमांक देखील सार्वजनिक करण्यात आले आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

 

News English Summary: Ambulances have been provided in all the Lok Sabha constituencies in Mumbai to help the patients and their relatives. Contact numbers for the general public have also been made public for this facility. The service has been launched by Mumbai Congress President MLA Bhai Jagtap.

News English Title: Mumbai congress has formed a covid Task Force to help corona patients during corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x