26 April 2024 11:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

कोरोनाच्या जीवनरक्षक औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांनो, जरा या चोराकडून शिका - जयंत पाटील

Corona vaccine

नवी दिल्ली, २३ एप्रिल: बुधवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास शासकीय रुग्णालयातून कोरोना लसीचे अनेक डोस चोरी झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त जितेंद्र खटकर यांनी दिली. परंतु, गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास चोर सिव्हील लाईन पोलीस ठाण्याबाहेर असलेल्या चहाच्या दुकानाच्या वयोवृद्ध मालकाकडे गेला आणि त्याच्याकडे एक पिशवी दिली. त्याने त्या चहावाल्याला सांगितले की, हे एका पोलिसांचे जेवण आहे. बॅग ताब्यात देवून चोर लगेच तेथून गायब झाला.

मात्र नंतर तो दुकानदार ती बॅग घेऊन पोलीस ठाण्यात गेला. तेथे उपस्थित पोलिसांनी बॅग उघडली तेव्हा त्यात कोविशिल्डचे 182 आणि कोवाक्सिनच्या 440 डोस दिसून आले. त्यात, एक चिठ्ठीही आढळून आली. ज्यामध्ये असे लिहिले होते, सॉरी, मला माहीत नव्हतं यात कोरोनाचं औषध आहे.

हरियाणातील या चोरट्यानं लिहिलेली चिठ्ठी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांनीही या चोरट्याची चिठ्ठी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केली आहे. तसेच, कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत जीवनरक्षक ठरणाऱ्या औषधांचा काळाबाजार करत आहेत. त्यांनी हरियाणातील या चोराकडून धडा शिकायला हवा, असे ट्विट जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे.

 

News English Summary: The letter written by this thief from Haryana is currently going viral on social media. State Water Resources Minister Janyat Patil also shared the thief’s letter on his Twitter handle. Also, coronas are blackmailing life-saving drugs in critical situations. They should learn a lesson from this thief in Haryana, tweeted Water Resources Minister Jayant Patil.

News English Title: Need to learned something from Corona vaccine thief said Jayant Patil to BJP leaders indirectly news updates.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x