27 April 2024 8:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Health first । वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर करा इडली सांबारचा हलका फुलका नाश्ता । नक्की वाचा

benefits of eating idli-sambhar

मुंबई २३ एप्रिल : आपल्यापैकी जवळजवळ सगळ्याच्यांच टिपिकल नाश्ता म्हणजे इडली-सांबार. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, इडली-सांबार खाल्ल्यास तुम्हाला वजन कमी करण्यात मदत होईल. इडली तर पचायला हलकी असते हे सर्वांना माहीत आहेच. कारण इडलीही तांदळापासून बनवलेली असते. त्यामुळे इडलीत कार्बोहायड्रेट, प्रोटीन, व्हिटॅमीन्स आणि मिनरल्स असतात. इडलीमधील कॅलरीजसुद्धा कमी असतात पण ती तेवढीच एनर्जी देणारी असते. याचमुळे इडली खाल्ल्याने वजन नियंत्रित राहतं. तसंच पचण्यासाठीही इडली हलकी असते. असं असूनही इडली खाल्ल्यावर तुम्हाला लगेच भूक लागत नाही. त्यामुळेच इडली भारतीयांच्या आवडत्या नाश्त्याच्या पर्यांयापैकी एक आहे.

उडीद डाळ, तांदूळ आणि रवा अशी विविध प्रकारे बनवली जाणारी इडली अनेकांना आवडते. आपल्या उच्च न्यूट्रिशन व्हॅल्यूमुळे इडलीला नाश्त्यासाठी सर्वात जास्त पसंती दिली जाते. वाफवलेली, टम्म फुगलेली आणि पचायला हलकी असणारी इडली आरोग्य आणि फिटनेस प्रती जागरूक असणाऱ्या लोकांमध्ये सर्वाधिक पसंत केली जाते. त्यामुळेच असं म्हणण्यात येतं की, इडली सांबार खाल्ल्यास तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.

पाहा इडली-सांबारमुळे कसं कमी होईल तुमचं वजन:

इडलीमध्ये तेलाचा वापर होत नाही:
इडली ही वाफेवर बनवली जाते. यामध्ये तेलाचा अजिबात वापर होत नाही. हेच कारण आहे की, यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात. इडलीही तांदळापासून बनवली जाते. तांदळामध्ये कार्ब्सची मात्रा अधिक असते. यामध्ये उडदाची डाळ देखील मिक्स केली जाते. यामुळे प्रोटीनचं प्रमाण देखील असतं. जर इडलीच्या पिठामध्ये आपण काही भाज्या बारीक चिरुन टाकल्या तर इडली आणखी स्वादिष्ट आणि पौष्टीक होते. इडली ही करायला देखील सोप्पी आणि झटपट अशी डिश आहे.

पचनासाठी देखील चांगली आहे इडली:
इडली ही पचनासाठी हलकी असते. याचं पीठ हे आंबवलेलं असल्याने त्यामध्ये व्हिटामिन बी अधिक असतं. हे पचनासाठी देखील चांगलं असतं. आंबवलेले पदार्थ हे शरीरात खनिज आणि व्हिटामिन्सची पूर्तता करतं. यामुळे पचन शक्ती देखील अधिक मजबूत होते. आंबवलेल्या पदार्थांमध्ये लॅक्टिक अॅसिड हे आतड्यांमधील पीएच स्तर बदलून टाकतो. जे आरोग्यासाठी खूपच लाभदायक असतं.

सांबारमुळेही वजन कमी होण्यास होते मदत:
सांबारमध्ये फायबर, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडेंट बरेच असतात. यामुळे पचनशक्ती बरीच वाढते. यामुळे वजन देखील कमी होतं. सांबारमध्ये अनेक प्रकारच्या भाज्या टाकल्या जातात. ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेलं आहे असं वाटतं. भोपळा, वांगं, शेवग्याच्या शेंगा, कांदा, टॉमेटं यासारख्या अनेक भाज्या यामध्ये असतात. या सगळ्या भाज्या अतिशय पोषक असल्याने त्यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते.

News English Summary: Idli-sambar is a typical breakfast for almost all of us. But you may be surprised to know that eating idli-sambar will help you lose weight. Everyone knows that Idli is easy to digest. Because idli is also made from rice. Therefore, idli contains carbohydrates, proteins, vitamins and minerals. Idli is also low in calories but it is just as energetic. This is why eating idli helps in weight control.

News English Title: Eat idli sambhar for control your weight news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x