27 April 2024 3:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा पैसा लस आणि ऑक्सिजन खरेदीसाठी वापरा | १२ विरोधी पक्षांच मोदींना पत्र

India corona pandemic

नवी दिल्ली, १३ मे | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नवे संकट उभे ठाकले आहे. या स्थितीत केंद्र सरकारने मोफत लसीकरण मोहीम राबवावी, सेंट्रल व्हिस्टासारख्या प्रकल्पासाठी खर्च केली जात असलेली रक्कम हे काम थांबवून आरोग्य क्षेत्रासाठी वापरावी, बेरोजगारांना मासिक ६ हजार रुपये द्यावेत, अशा एकूण ९ मागण्यांचे खुले पत्र १२ विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना लिहिले आहे.

संबंधित खुल्या पत्रावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह १२ विरोधी पक्षनेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणीही यात आहे. विरोधी पक्षांनी यापूर्वीही काही सल्ले दिले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचे परिणाम आता देश भोगत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

नेमक्या कोणत्या मागण्या आहेत विरोधी पक्षांच्या;

  1. देशांतर्गत किंवा विदेशातून शक्य तेथून लस खरेदी करण्यात यावी.
  2. संपूर्ण देशात मोफत लसीकरण मोहीम तत्काळ सुरू करण्यात यावी.
  3. देशांतर्गत लसनिर्मितीसाठी परवाना बंधनकारक करण्यात यावा.
  4. लसीसाठी ३५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा.
  5. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर बंदी आणावी. यासाठी वापरला जाणारा पैसा लस आणि ऑक्सिजन खरेदीसाठी वापरावा.
  6. पंतप्रधान निधीसह इतर सर्व खासगी निधीतील पैसा वैद्यकीय उपचारांसाठी, उपकरणांसाठी वापरावा.
  7. बेरोजगारांना मासिक ६ हजार रुपये देण्यात यावेत.
  8. सर्व गरजूंना मोफत धान्य पुरवावे.
  9. कृषी कायदे मागे घ्यावेत. जेणेकरून महामारीत फटका बसलेले लाखो शेतकरी देशातील जनतेसाठी अन्नधान्य उत्पादन करू शकतील.
  10. १२ विरोधी पक्षांची पंतप्रधानांकडे मागणी, निधीच्या वापराबाबतही केल्या सूचना

 

News English Summary: The second wave of corona in the country has created a new crisis. In this situation, the central government should launch a free vaccination campaign, stop spending on projects like Central Vista and use it for the health sector, pay Rs 6,000 monthly to the unemployed, a total of 9 open letters to the Prime Minister.

News English Title: Use money of Central Vista Project to buy vaccines and oxygen during corona pandemic letters from 12 opposition parties to PM Modi news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x