4 May 2024 4:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या
x

मराठा आरक्षणप्रश्नी आज संभाजीराजे आणि मुख्यमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक

Maratha reservation

मुंबई, १७ जून | मराठा आरक्षणासाठी काल मोर्चा काढल्यानंतर खासदार संभाजी छत्रपती आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत पाच मागण्या आणि मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. मात्र, भेट सकारात्मक न झाल्यास काय होईल हे सांगायची गरज नाही, असा सूचक इशाराच संभाजी छत्रपती यांनी बैठकीपूर्वी दिला आहे. त्यामुळे आजच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संभाजी छत्रपती यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना पाच मागण्या दिल्या आहेत. मूक आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेला बोलावलं. त्याचं मी स्वागत करतो. चर्चा सकारात्मक होईल याची अपेक्षा आहे. मात्र, चर्चा झाली नाही तर काय होईल हे मला सांगायची गरज नाही, असा सूचक इशारा संभाजीराजेंनी दिला

कोल्हापूरमध्ये काल शाहू महाराजांच्या समाधीस्थळी राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विविध पक्षांचे आमदार खासदार आणि वंचित बहुजन आघाडी चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मूक आंदोलन पार पडलं. या आंदोलनामध्ये खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे सर्व कुटुंबीय देखील उपस्थित होते. यावेळी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतीश पाटील आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती तयार असतील तर त्यांची तत्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घडवून आणू असं आश्वासन मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांच्या समोर बोलताना दिलं होतं.

यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती आणि राज्यभरातून आलेले मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांची मुक आंदोलन संपल्यानंतर त्या ठिकाणीच एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते ग्राम विकास मंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाला प्रतिसाद देत उद्याच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा निश्चित करण्यात आलं. त्यानुसार आज, गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: MP Sambhajiraje Chhatrapati will meet CM Uddhav Thackeray on Maratha reservation news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x