2 May 2024 5:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा
x

Sarkari Naukri | MAHATRANSCO मध्ये तब्बल 8500 जागांसाठी होणार भरती

Mahatransco recruitment 2021

मुंबई, २२ जून | कोरोनामुळे सरकारी नोकरीच्या जागाही निघत नसल्यानं तरुणाईमध्ये नाराजीचं वातावरण आहे. मात्र आता MSEB च्या महापारेषण विभागात लवकरच तब्बल 8500 जागांसाठी पदभरती होणार आहे. यामध्ये येणारे सर्व अडथळे दूर झाले आहेत आणि पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊतांनी दिली आहे.

महावितरण, महापारेषण आणि महामात्रनिर्मिती या कंपन्यांमधील रिक्त पदाची भरती प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आलेली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानं राज्यात भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती, असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. ‘परंतु यावर तोडगा काढण्यासाठी कंपन्यांचे उच्चाधिकारी या नात्यानं काय प्रयत्न केले’, असा प्रश्न विचारत डॉ. राऊत यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं.

आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महापारेषण कंपनीत तब्बल 8,500 जागांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पदभरतीची वाट बघत असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या सूचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की पोहचावा.

News Title: Mahatransco recruitment 2021 for 8500 notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x