28 April 2024 8:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

शिवसैनिकांसमोर आवाज न करता शांत बसलेले मेटे शिवसैनिक गेल्यावर पत्रकार परिषदेत गरजले.... काय म्हणाले?

Vinayak Mete

औरंगाबाद, २४ जून | शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे बैठक सुरु होती. मात्र, या बैठकीत अचानक गदारोळ सुरु झाला. काही तरुण अचानक बैठकीत आले. त्यांनी जोरजोरात आरडाओरड करायला सुरुवात केली. ते विनायक मेटे यांच्याजवळ आले. भाजप सरकार असताना प्रश्न का सोडवला नाही? असा सवाल या तरुणांनी केला. या तरुणांनी ही बैठक उधळून लावली.

यावेळी सभेत उपस्थित असलेले इतर नागरिक शांतपणे सर्व प्रकार बघत राहिले. विशेष म्हणजे विनायक मेटे यांच्यासमोर हा सर्व प्रकार घडला. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर कार्यकर्त्यांनी आक्रमक कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने संबंधित प्रकार निवाळण्यात आला.

मात्र संपूर्ण प्रकार घडत असताना आणि शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहून आवाज न करत शांत बसलेले मेटे शिवसैनिक गेल्यावर मात्र पत्रकार परिषदेत गरजल्याच पाहायला मिळालं. शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे स्वत: या बैठकीत हजर होते. मात्र, काही शिवसैनिकांनी आरडाओरड, गोंधळ घातल ही बैठक बंद पाडली. अखेर या गदारोळामुळे विनायक मेटे यांना बैठकीतून बाहेर पडावं लागलं. या गदारोळानंतर मेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला. “शिवसंग्रामच्या बैठकीत गोंधळ घालणाऱ्या गावगुंडांवर आम्ही गुन्हा दाखल केला आहे. या गावगुंडांना अटक नाही झाली तर परवाच्या मेळाव्यात आम्ही निर्णय घेऊ. ही सरकारची गुंडगिरी आहे. आम्ही सहन करणार नाहीत. स्वस्थ बसणार नाहीत. आम्ही गप्प आहोत याचा अर्थ आम्ही बांगड्या भरल्या असा होत नाही”, अशा शब्दात मेटे यांनी रोष व्यक्त केला

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Vinayak Mete reacted after Shivsena worker clash in Shivsangram meeting at Aurangabad news updates.

हॅशटॅग्स

#VinayakMete(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x