3 May 2024 9:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

राज्यातील सरकार पाच वर्षे टिकेल, तिन्ही पक्षांमध्ये योग्य समन्वय - शरद पवार

MavaVikas Aghdi

बारामती, २७ जून | काही मुद्द्यांवर एकत्र येत राज्यातील महाविकासआघाडी सरकार स्थापन झाले. सरकार चालवताना काही प्रश्न उपस्थित होत असतात. त्यावर मार्ग काढण्यासाठी एक यंत्रणा काम करत आहे. त्यामुळे हे सरकार पाच वर्ष टिकेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. पवार आज (रविवारी) बारामतीतील गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

तिन्ही पक्षांमध्ये योग्य समन्वय:
शरद पवारकाँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. यावर ते बोलताना म्हणाले की, राज्यातील तीनही पक्षांची सरकारमधील भूमिका हा एक भाग आहे. तर राजकीय पक्ष म्हणून संघटनेचं काम वाढवणं ही दुसरी बाजू आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणं हे स्वाभाविक आहे. हा प्रयत्न करण्यासंदर्भात आमच्या सर्व पक्षांचं सामंजस्य आहे. यात कुठलेही मतभेद नाहीत. तसेच तिन्ही पक्षात मतभेद होऊ नये म्हणून चर्चा झाली. त्यानुसार अजित पवार, जयंत पाटील, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे समन्वय साधण्याचे काम करत आहेत. कोणत्याही महत्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी हे सहा सहकारी एकत्र बसतात आणि त्यावर निर्णय घेतात, असे पवार यांनी स्पष्ट केले.

आरबीआयचा निर्णय धोरणात्मक असेल तर स्वीकारावाच लागेल:
आरबीआयने नवीन आदेश दिले असून यापुढे लोकप्रतिनिधींना सहकारी बँकेचे अध्यक्षपद मिळणार नाही, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, आरबीआय ही अर्थकारणावर आणि संबंधित संस्थांवर नियंत्रण असणारी संस्था आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेतला असेल तर त्याची माहिती घ्यावी लागेल. परंतु, त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर तो स्वीकारावाच लागेल, असेही मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: MahaVikas Aghadi will complete tenure of five years said NCP president Sharad Pawar news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x