26 April 2024 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार
x

केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रसह इतर राज्यांमध्ये मुख्यमंत्री लादले | त्याच राज्यांमध्ये पक्षाचं नुकसान | भाजपा नेत्याचा घणाघात

PM Narendra Modi

जयपूर, २१ जुलै | देशातील सर्वोच्य पदावरील जो जनतेचं म्हणणं ऐकून घेत नाही, त्याला हुकुमशाह म्हणतात’, असा घणाघात भारतीय जनता पक्षाचे राजस्थानमधील माजी आमदार आणि कट्टर वसुंधरा राजे समर्थक नेते रोहिताश्व शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे लक्ष केलं आहे. ‘आपण कुणालाही घाबरत नाही. जे चुकीचे आहे, त्याविरोधात बोलू कारण यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यांवर नेतृत्व लादलं. जिथे जिथे नेते लादण्यात आले, तिथे तिथे भारतीय जनता पक्षाचं सरकार गेलं’, अशा शब्दात शर्मा यांनी भारतीय जनता पक्षाला घरचा आहेर दिला. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका करताना महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचं सरकार जाण्याकडेही लक्ष वेधलं.

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या वसुंधरा राजे यांच्या गटातील रोहिताश्व शर्मा यांना पक्षविरोधी कार्य केल्याबद्दल भारतीय जनता पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. रोहिताश्व शर्मा यांनी भारतीय जनता पक्षाचे राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांच्यावर टीका केली होती. “त्यांचा (सतीश पुनिया) गैरसमज झाला आहे की, तीन वर्ष प्रदेशाध्यक्ष राहिल्यामुळे मुख्यमंत्री बनतील; पण त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने ज्या ज्या राज्यावर नेतृत्व लादलं तिथे तिथे भारतीय जनता पक्षाला सत्ता गमवावी लागली. त्यामुळे जनतेच्या हिताचं काम करणाऱ्या स्थानिक नेतृत्वाकडे सुत्रं द्यायला हवीत. तेव्हाच राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची सरकारं येऊ शकतात”, असं रोहिताश्व शर्मा यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि हरयाणामध्ये मुख्यमंत्री लादले. ज्यामुळे या राज्यांत पक्षाची पिछेहाट होत आहे. पक्षासाठी हुकुमशाही चुकीची आहे. मी कुणालाही घाबरत नाही. जे चुकीचं आहे आणि ज्यामुळे पक्षाला नुकसान होत आहे, त्याविरोधात बोलणार’, शर्मा यांनी म्हटलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Rajasthan BJP leader Rohitashav Sharma slams Narendra Modi Amit Shah on dominating BJP in every state news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x