26 April 2024 4:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

मुंबई पोलिसांच्या रिपोर्टवर आधारीत बातम्या मानहानीकरक कशा असू शकतात? | हायकोर्टाने शिल्पा शेट्टीला झापले

Raj Kundra Porn

मुंबई, ३१ जुलै | पोर्न व्हिडीओ प्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, मुंबई पोलिसांच्या रिपोर्टवर आधारीत बातम्या या मानहानीकरक कशा असू शकतात? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयानं शिल्पा शेट्टीला विचारला.

तुम्ही एक सेलिब्रिटी आहात लोकांना तुमच्याबद्दल वाचायला आवडतं, म्हणून लिहिलं जातंय. तसंच तुमच्याशी संबंधीत काही घडतंय आणि त्याबद्दल जर लिहिले गेले असेल तर त्यांवर तुम्ही बंधने आणण्याची मागणी कशी काय करू शकता? असा उलट प्रश्नच न्यायालयाने शिल्पा शेट्टीला केला. दरम्यान या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलेल्या सर्वांना 18 ऑगस्टपर्यंत तर शिल्पा शेट्टीला 26 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी 20 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

मानहानीकारक वृत्त प्रसिद्ध केल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने केलेली मागणी मान्य करून प्रसिद्धीमाध्यमांना वृत्तांकन करण्यापासून सरसरकट मज्जाव केला तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे, असे मत उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त केले. त्याचवेळी माध्यमांचे स्वातंत्र्य एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेच्या अधिकाराशी संतुलित असणे आवश्यक असल्याचेही म्हटले.

पत्रकारिता ही अभिव्यक्तीशी संबंधित आहे. त्यामुळे चागंली आणि वाईट पत्रकारिता कशाला म्हणावे याबाबत न्यायालयालाही मर्यादा आहेत, असेही न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी स्पष्ट केले.पण पत्रकारीता ही विश्वासहार्य आणि जबाबदारीने केली पाहिजे हे ही तितकंच खरं आहे त्यामुळे न्यायालय असे निर्देश देवू शकत नाही’, असं सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती गौतम पटेल यांन स्पष्ट केलं.

मानहानीकारक वृत्तांमुळे झालेल्या मानसिक त्रासासाठी शिल्पाने २५ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची तसेच समाजमाध्यमे व संकेतस्थळांनी प्रसिद्धीमाध्यमांतील वृत्तांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली होती. परंतु शिल्पाची ही मागणी धोकादायक असल्याचे न्यायालयाने म्हटले. आम्ही कोणत्याही न्युज चॅनलवर बंदी घालण्याची मागणी करत नाही, मात्र वार्तांकन करताना वैयक्तिक पातळीवर टिका टिप्पणी नसावी असा युक्तीवाद शिल्पा शेट्टीच्या वतीने करण्यात आला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai High court slams Shilpa Shetty over defamation case against Media report news updates.

हॅशटॅग्स

#HighCourt(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x